कोलकाता: आल्या दिवशी सायबर फसवणुकीची नव नवी प्रकरणे समोर येत आहे. या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वृद्ध व्यक्तींना मोठ्या शिताफीने अडकवले जाते आणि त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. या प्रकरणात एका वृद्ध व्यक्तीला ६.५ लाख रूपयांचा चुना लावण्यात आला.
एका न्यूज रिपोर्टनुसार पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार सायबर फसवणुकीचा हा प्रकार अनोळखी नंबरवरून येणाऱ्या एका कॉलने सुरू झाला. पीडित व्यक्तीला एका अनोळखी नंबरवरून हा व्हिडिओ कॉल आला. या व्हिडिओ कॉलवर समोर एक अनोळखी तरूणी होती.
यानंतर काही दिवसांनी पीडित व्यक्तीला एका नंबरवरून कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने एक फोटो दाखवला ज्यात ही व्यक्ती एका महिलेसोबत होती. मात्र हा फोटो फेक असल्याचे पीडित व्यक्तीने सांगितले.
अनोळख्या व्यक्तीने वृद्ध व्यक्तीला फोटो दाखवला आणि पैसे पाठवले नाही तर फोटोला सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली. यानंतर पीडित व्यक्तीने घाबरून काही पैसे ट्रान्सफर केले. यानंतर पीडित व्यक्तीकडे आणखी एक कॉल आला.
कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वत: पोलीस असल्याचे सांगितले. यानंतर पीडित व्यक्तीला सांगितले की फोटोत दिसणाऱ्या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर पीडित व्यक्ती घाबरला. यानंतर पोलीस सांगणाऱ्या व्यक्तीने मोठी रक्कम मागितली. पीडित व्यक्तीने एकूण ६.५ लाख रूपये ट्रान्सफर केले. यानंतरही सायबर फसवणूक करणाऱ्यांचे कॉल काही थांबत नव्हते. यामुळे पीडित व्यक्तीला संशय आला आणि त्या व्यक्तीने पत्नीला ही बाब सांगितली.
पत्नीला समजले की ही एक प्रकारची सायबर फसवणूक आहे. हे सायबर फसवणूक करणारे लोक विविध बहाणे करून चुना लावतात.