मालवणमध्ये 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या भंगारव्यवसायिकावर पालिकेचा हातोडा!

मालवण : जय श्री राम... भारत माता की जय... छत्रपती शिवाजी महाराज की जय... इस देश मे रहना होगा...वंदे मातरम कहना होगा... अशी गगनभेदी घोषणाबाजी करत मालवणात हिंदू बांधवानी पोलीस ठाण्यावर धडक दिली. देशद्रोही प्रवृत्तीच्या राष्ट्र विरोधी घोषणा देणाऱ्या परप्रांतीय मुस्लीम भंगार व्यावसायिका विरोधात संताप व्यक्त करत, मालवणात हिंदू समाज एकवटला. सध्या सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर देशभरात सुरू असलेल्या जल्लोषाला गालबोट लावणारा प्रकार मालवणमध्ये घडला. येथे एका परप्रांतिय भंगार व्यावसायिकाने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याने स्थानिक संतप्त झाले. तसेच प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर स्थानिक प्रशासनाने या परप्रांतिय भंगार व्यावसायिकाच्या दुकानावर जेसीबीद्वारे तोडक कारवाई केली आहे.



मुस्लीम समाजातील काही समाजकंटक, समाज विघातक, राष्ट्र विघातक व जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून सातत्याने हिंदू व्यक्तीना व त्यांच्या भावनाना लक्ष करण्याचे काम सुरु आहे. यावर तातडीने परिणामकारक कारवाई व्हावी. या आशयाचे निवेदन पोलीस प्रशासनास देण्यात आले. यावेळी मोठया संख्येने सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने रविवारी पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरु असताना मालवण शहरात आडवण परिसरात मात्र परप्रांतीय भंगार व्यवसायिकाकडून भारत विरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला. याबाबत हिंदू समाज संतप्त बनला. तक्रारदार सचिन वराडकर व हिंदू समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांनी त्या देशद्रोही भंगार व्यावसायिक कुटुंबावर कारवाई केली. किताबुल्ला हमीदउल्ला खान, आयेशा किताबुल्ला खान रा. आडवण मालवण यां दोघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र त्यांचे वकीलपत्र कोणीही घेतले नसल्याने दोघांनाही सावंतवाडी कारागृहात नेण्यात आले. मात्र यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे यासाठी मालवण देऊळवाडा येथे एकत्र येत शेकडो हिंदू समाज बांधवानी मोटरसायकल रॅली काढून व जोरदार घोषणा देत मालवण पोलीस ठाण्यात धडक दिली.


मागील काही महिन्यात देशविरोधी कारवाईबाबत संबंधितांची सखोल चौकशी व्हावी. भंगारवाले, भाजीवाले व बाहेरील आलेले मुस्लीम व्यवसायिक यांची पूर्ण चौकशी करावी व यांचे आधार कार्ड तपासून मुख्य रहिवासी कुठले आहेत याची शहानिशा करावी. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.



संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी - आ. निलेश राणे


त्या देशद्रोही मुस्लीम परप्रांतीय भंगार व्यावसायिका विरोधात मालवण नगरपरिषद प्रशासनाकडे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या वतीने निवेदन देताना, तो व्यावसायिक राहत असलेल्या ठिकाणी अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम केले आहे ते तत्काळ हटवण्याची भूमिका मांडण्यात आली. त्यानुसार तत्काळ कारवाई प्रशासनाने करून अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटवले. दरम्यान,परप्रांतीय मुस्लीम भंगार व्यावसायिकाने दिलेल्या देश विरोधी घोषणा व भूमिकेचा मालवणातील मुस्लीम समाजानेही निषेध व्यक्त केला. संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी. याबाबत पोलिसांना निवेदन देण्यात आले.




Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी