Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीगिरणा माईचे वस्त्रहरण वाळू माफियांकडून सुरूच

गिरणा माईचे वस्त्रहरण वाळू माफियांकडून सुरूच

जळगाव : भडगाव तालुक्याला व शहराला वरदान ठरलेली गिरणा माईचे वस्त्रहरण वाळू माफियांकडून सुरूच असून याबाबत या वाळूमाफियांवर महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन गेल्या काही महिन्यांपासून सतत कारवाई करत आहे. तरीसुद्धा वाळूमाफियागिरी ही भडगाव शहरात व तालुक्यात काही कमी होताना दिसत नाही. यावर महसूल विभागाने सोमवारी सकाळी पाच वाजता भडगाव शहरातील गिरणा पंपिंग जवळ तीन जेसीबी व चार ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करण्यास गेले असता त्या ठिकाणावरून सदर वाहने पळून लावले. याबाबत महसूल विभागाच्या पथकाने सरळ भडगाव पोलीस स्टेशनला ५४ लाख रुपये चा मुद्देमाल यामध्ये तीन जेसीबी व चार ट्रॅक्टर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत व भडगाव तालुक्यातील करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे फिर्यादी -प्रशांत भिका कुंभारे, (वय ४६), तलाठी टोंणगाव रा. शिवाजी नगर भडगांव, यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भडगाव पाचोरा तालुक्यातील गिरणा नदीपात्रातुन वाळुचे अवैध उत्खनन व वाहतुक रोखण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. मी तसेच महादु कोळी, महसुल सहाय्यक, तहसिल कार्यालय भडगाव असे तहसील कार्यलय भडगाव येथुन अवैध वाळु वाहतुक कारवाईसाठी आमच्या मोटार सायकल ने रवाना झालो व कराब रोड ने गिरणा नदी जवळ जावून आमच्या मोटारसायकली नदी काठी लावली तेंव्हा तेथून पायी जात असतांना आम्हाला गिरणा नदी पात्रात नविन पूलाचे काम चालू असलेले ठिकाणा जवळ ०३ जे. सी. बी. मशिनच्या सहाय्याने गिरणा नदीपात्रातुन वाळु उत्खनन करुन ०४ ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये भरतांना दिसले.

चार भारतीय कंपन्यांवर ट्रम्प प्रशासनाकडून निर्बंध

दरम्यान लागलीच आम्ही त्याठिकाणी जात असताना सदर वाहनांवरिल चालक यांनी आम्हाला ओळखले व आम्ही जवळ येत असल्याचे पाहुन त्यांनी त्यांचे ताब्यातील वाहने ०३ जे. सी. बी. व ०४ ट्रॅक्टर ट्रॉलीसह घेवून कराब रोड ने भडगाव शहराकडे पळून गेले. त्यापैकी एका जे. सी. बी मशिनचा क्र एमएच १६. एफ ९९४७ असा असलेला मी पाहीला माझे सोबत असलेले महादु कोळी यांनी त्यांचे मोबाईल मध्ये सदर वाहनांचे फोटो व व्हिडीओ काढले आहेत. उजेड झाल्याने आम्ही सदर ठिकाणची पाहणी केली असता नदीपात्रात जेसीबी चे सहाय्याने खड्डा खोदून त्यातुन अंदाजे ४० ते ५० ब्रास वाळु चोरून नेली असल्याचे दिसुन आले.

ठिकाणावरुन पळुन नेलेले जेसीबी व ट्रॅक्टर व ट्रॉली व चोरीस गेलेल्या मुद्देमालाचे वर्णन खालीलप्रमाणे १) १० लाख रूपये कि. चे एक जे. सी. बी. मशिन क्र एमएच १६ एफ ९९४७ असलेला कि. अ. २)१० लाख रूपये कि. चे एक जे. सी. बी. मशिन क्र विना नंबर चे कि. अ. ३)१० लाख रूपये कि. चे एक जे. सी. बी. मशिन क विना नंबर चे कि. अ. ४)१२ लाख रूपये कि. चे ४ ट्रॅक्टर ट्रॉली सह विना नंबर चे कि. अ. ५)११, ८१००० रूपये कि. चे ४० ते ५० ब्रास वाळू, कि. अ. असा एकूण ५३, ८१, ५०० /- रु चा मुद्देमाल वरिल वर्णनाचे व किंमतीचे ०३ जेसीबी ‘चे सहाय्याने ०४ ट्रॅक्टर व ट्रॉलीमधे सदर वाहनांवरिल ०७अनोळखी ईसमांनी अवैध गौणखनिज केले. म्हणुन भडगाव पोलिस स्टेशनला ६५/२०२५, कलम भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३, ३०३(२), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ ४८(७) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, ४८(८) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक सुशिल सोनवणे हे करीत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -