मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) हे महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड आहे, शिव्या देणे हा त्यांचा इतिहास आहे, असे वक्तव्य करत भाजपा आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जोरदार प्रहार केला आहे.
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यावर केलेल्या टीकेनंतर चित्रा वाघ यांनी जोरदार हल्लाबोल करत संजय राऊतांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला.
नीलम गोऱ्हे यांच्यावर राऊतांनी “निर्लज्ज, नमकहराम” अशा शब्दांत टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ म्हणाल्या, “संवैधानिक पद भूषवणाऱ्या एका महिलेबद्दल इतक्या अश्लील आणि घाणेरड्या भाषेत बोलण्याचा संजय राऊतांचा इतिहास आहे. महिलांबद्दल वाईट बोलणे, त्यांना शिवीगाळ करणे, त्यांना धमकावणे, हे त्यांचे ठरलेले वर्तन आहे. स्वप्ना पाटकर यांना दिलेल्या अश्लील शिव्यांची ऑडिओ क्लिप आजही समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “अशा नाठाळ लोकांना आता महाराष्ट्रातील महिलांनीच वठणीवर आणले पाहिजे. महिलांचा अपमान करणाऱ्या संजय राऊतांना मर्यादा दाखवण्याची वेळ आली आहे.”
दरम्यान, नीलम गोऱ्हे यांनी काही दिवसांपूर्वी “ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळते,” असा गंभीर आरोप केला होता. या वक्तव्यावर संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली.
राऊत म्हणाले, “नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य ही त्यांची मानसिक विकृती दर्शवते. ज्या पक्षामुळे त्या आमदार झाल्या, त्याच पक्षाविरोधात बोलणे ही नमकहरामी आहे. मला आठवते, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ‘ही बाई कोण आणली?’ चार वेळा आमदार झाल्यावर आता त्या निघून जाताना ताटात घाण करून गेल्या आहेत.”
या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, महिला नेत्यांनी राऊतांच्या वक्तव्याचा तीव्र विरोध केला आहे.
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…