आंगणेवाडी जत्रोत्सवाची उत्साहात सांगता !

  92

महाप्रसादाच्या कार्यक्रमाने मंदिर प्रांगण बहरले


आंगणेवाडी (प्रतिनिधी): कमल पदी तुज नमितो माते, जय जय भराडी देवी... जय जय भराडी देवी...! असा ध्वनीक्षेपकावर चालू असलेला देवीचा गजर, महाप्रसादाचा सोहळा पाहण्यासाठी देवालयाच्या प्रांगणात उसळलेली भक्तांची गर्दी असाच नजारा शनिवारी रात्री आंगणेवाडीत पाहावयास मिळाला. महाप्रसाद ताटे लावण्याच्या कार्यक्रमासाठी रात्री ९.४५ वाजता बंद झालेली दर्शन रांग पुन्हा रात्री १.३० नंतर चालू झाली. सकाळच्या सत्रापेक्षा सायंकाळी भाविकांनी अनुभवली ती उच्चांकी गर्दी.


रविवारी सुद्धा भाविकांच्या गर्दीने आंगणेवाडी यात्रा परिसर फुलुन गेला होता. प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या यात्रोत्सवाची सांगता रविवारी सायंकाळी उत्साहात झाली. दोन दिवसांत आंगणेवाडीत सुमारे आठ लाख भाविकानी देवीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरातील दर्शन रांगांमधील भाविकांचा ओघ रविवारी सायंकाळनंतर चालूच होता. रविवारी आंगणे ग्रामस्थानी देवीचे दर्शन घेऊन ओट्या भरल्या.


शनिवारी रात्री गर्दीचा ओघ वाढला सायंकाळ नंतर भाविकांची गर्दी उत्तरोत्तर वाढत गेली. रात्री बारा नंतर तर देवालयाच्या बाहेरील परिसरात रस्त्यावरुन चालणे अवघड बनले होते. यात्रेच्या दोन दिवसात लाखो रुपयांची उलाढाल झाली. मनोरंजनाच्या खेळण्यांच्या भागात बच्चे कंपनीची गर्दी झाली होती. यात्रोत्सवात सेवा दिलेल्या शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांचे यावेळी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडी यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. मोड यात्रेत शेतीची अवजारे व गृहपयोगी साहीत्य खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती.



एकूण नऊ रांगाद्वारे दर्शन व्यवस्था आंगणे कुटुंबीयांच्या वतीने केल्याने तसेच योग्य नियोजनामुळे भाविकाना काही वेळातच देवीचे दर्शन मिळत होते. कुठलीही दर्शन रांग खोळंबलेली दिसून येत नव्हती. ठिकठिकाणी लावलेल्या ४८ सीसी टीव्ही कॅमेरा सहाय्याने स्वागत कक्षामधून बाबू आंगणे, बाळा आंगणे यांच्याकडून वेळोवेळी सुचना देण्यात येत होत्या. सदर व्यवस्था आंगणे कुटुंबीय व रोहन व्हीडिओ कॉम्प्युटेक मुंबईचे अनंत आंगणे यांच्या वतीने करण्यात आली होती.
Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी