Pune News : पोटच्या तीन पोरींनी मृत्यूपत्रावर अंगठ्याचे चोरून घेतले ठसे

पुणे  : पिंपरी-चिंचवड शहरात बाप आणि मुलीच्या प्रेमळ नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वडिलांच्या ‘ब्रेन डेड’ होण्याच्या वेळी, त्यांच्या तीन मुली आणि एक मुलगा, सर्वांची आर्थिक परिस्थिती चांगली असताना, वडिलांची मालमत्ता मिळवण्यासाठी एका बनावट मृत्यूपत्रावर अंगठ्याचे ठसे घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी कर्करोग आणि हृदयरोगाने त्रस्त असलेल्या या व्यक्तीला तीन मुली आणि एक मुलगा आहेत. सर्व मुलांचे विवाह झाले आहेत आणि घरातील आर्थिक स्थिती देखील उत्तम आहे. वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना १४ जानेवारीला पिंपरीतील एका नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांची स्थिती खूपच खराब झाली आणि ते 'ब्रेन डेड' झाले.



दरम्यान, पिंपळे गुरव येथील वडिलांच्या नावावर एक गुंठा जमीन आणि तीन मजली घर आहे. मुलींना, वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही, असा समज झाला. यामुळे, वडिलांची सेवा न करता, त्यांचे अंगठ्याचे ठसे चोरून बनावट मृत्युपत्र तयार करण्याचा त्यांनी कट रचला. १९ फेब्रुवारी रोजी मुली वडिलांच्या बेडजवळ गेल्या आणि त्यांचे अंगठ्याचे ठसे घेतले. त्याच वेळी, दुसऱ्या कागदावर त्यांची सही घेण्याचा प्रयत्न केला. रुग्णालय प्रशासनाने ही बाब त्वरित लक्षात घेतली आणि मुलींना थांबवण्यात आले. पोलिसांना आणि मुलाला फोन करून माहिती दिली. त्यानंतर मुलाने संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. ही घटना खूपच धक्कादायक असून, मुलींनी वडिलांची सेवा न करता, केवळ मालमत्तेसाठी केलेला बनावट मृत्युपत्र तयार करून मालमत्ता घेण्याचा प्रयत्न केल्याच्या या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. घरात कधीही वडिलांच्या मालमत्तेविषयी वाद नाहीत, तरीही मुलींनी अशा प्रकारे वडिलांची सेवा सोडून त्यांच्याशी असा व्यवहार का केला, हे एक मोठे रहस्यमय प्रश्न बनले आहे. दरम्यान सर्वांची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याची
माहिती आहे.


उपचार सुरू असलेल्या संबंधित रूग्णाच्या मुलाने या घटनेबाबत माहिती देताना एका वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही चार भाऊ-बहिणी आहोत. बहिणी कधी-कधी वरचेवर घरी येत-जात असायच्या. मात्र, वडील आजारी पडल्यापासून त्या कधीही रुग्णालयात भेटायला आल्या नाहीत. मात्र, जेव्हा, वडिलांची प्रकृती खूप जास्त गंभीर असल्याची माहिती मिळाली, त्यांचा जीव वाचणे शक्य नाही, अशी माहिती मिळाल्यावर त्या दोन-तीन दिवस रुग्णालयात आल्या. मात्र, रुग्णालयात येऊन त्यांनी असा प्रकार केला. ही घटना अतिशय धक्कादायक आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे. या घटनेची पुणे शहरात दिवसभर चर्चा सुरु होती.

Comments
Add Comment

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द