रविवारी २३ फेब्रुवारीला रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रविवार २३ फेब्रुवारी २०२५ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आहे. यामुळे प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. मेगाब्लॉक काळात काही लोकल विलंबाने धावतील तर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.



मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन फास्ट ट्रॅकवर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० या वेळेत मेगाब्लॉक आहे. तसेच मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी - नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन स्लो ट्रॅकवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन फास्ट ट्रॅकवर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मेगाब्लॉक आहे.



अंबरनाथ आणि वांगणीदरम्यान दोन पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीसाठी अप आणि डाऊन मार्गावर रविवार २३ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्री १.३० ते ३ या वेळेत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकवेळेत बदलापूर स्थानकाच्या कल्याण दिशेला १२ मीटर रुंदीचा पादचारी पुलाचा गर्डर उभारला जाईल. तसेच बदलापूर-वांगणीदरम्यान ४ मीटर रुंदीच्या पादचारी पुलासाठी गर्डर उभारला जाईल. या कामांमुळे गाडी क्रमांक ११०२० भुवनेश्वर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कोणार्क एक्स्प्रेस कर्जत-पनवेल मार्गे वळवण्यात येईल. या गाडीला पनवेल थांबा देण्यात आला आहे.



शनिवारी मध्यरात्री १२.१२ सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत धावेल.
शनिवारी ११.५१ सीएसएमटी-बदलापूर लोकल अंबरनाथपर्यंत धावेल.
शनिवारी २३:१३ परळ -अंबरनाथ लोकल बदलापूर स्थानकापर्यंत धावणार आहे.
शनिवारी मध्यरात्रीनंतर २.३० कर्जत-सीएसएमटी लोकल अंबरनाथवरून सुटेल.
शनिवारी ११.३० सीएसएमटी-कर्जत (ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल)
रविवारी ३.३५ कर्जत-सीएसएमटी (ब्लॉकनंतर पहिली लोकल)

चर्चगेट ते मरिन लाइन्सदरम्यान वानखेडे पादचारी पुलाचा गर्डर उभारण्यासाठी रविवार २३ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्री १.१५ ते पहाटे ४.१५ पर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक पश्चिम रेल्वे मार्गावर घेतला जाईल. यासाठी रात्री १२.५० बोरिवली - चर्चगेट आणि रविवारी पहाटे ४.३८ चर्चगेट - बोरिवली लोकल रद्द केली जाईल.

मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान रद्द लोकल फेऱ्या

मध्यरात्रीनंतर १२.१० बोरिवली-चर्चगेट
शनिवारी रात्री ११.४९ विरार-चर्चगेट
मध्यरात्रीनंतर १२.३० बोरिवली-चर्चगेट
मध्यरात्रीनंतर १२.०५ विरार-चर्चगेट
Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती