मुंबई : डिजीटल पेमेंट (Digital Payment) सुविधा उपलब्ध झाल्यापासून अनेकजण गुगल पे (Google Pay), फोन पे अशा अॅपचा वापर करतात. यामध्ये मोबाईल रिचार्ज आणि बिल पेमेंट अशा इतर सेवांसाठी गुगल पे वापरतात. आतापर्यंत गुगल पे त्यांच्या सेवा मोफत देत होते, परंतु आता कंपनीकडून नियमावलीत काहीसे बदल करण्यात आले आहे. यामुळे गुगल पे युझर्सना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, “गूगल पे ने गॅस आणि वीज बिलांसारख्या पेमेंटसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड (Credit or Debit Card) वापरणाऱ्या युझर्सकडून ‘प्रक्रिया शुल्क’ आकारण्यास सुरुवात केली आहे. फोनपे आणि पेटीएम देखील बिल पेमेंट, रिचार्ज आणि इतर सेवांसाठी समान शुल्क आकारतात. हे शुल्क व्यवहार रकमेच्या ०.५ टक्के ते १ टक्क्यांपर्यंत असू शकते. या प्रोसेसिंग शुल्कावर उत्पादन शुल्क आणि सेवा कर (जीएसटी) देखील आकारला जात आहे.
जर प्रक्रिया शुल्क लागू असेल, तर पेमेंट करताना तुम्हाला ते कोणत्याही बिलाच्या रकमेसह दिसेल. तुम्ही Google Pay अॅपच्या जुन्या व्यवहारात (History) प्रक्रिया शुल्क देखील पाहू शकता. त्यामध्ये बिलाच्या रकमेसह आकारण्यात येणारे प्रक्रिया शुल्क सूचीबद्ध आहे.
मुंबई : कधी मराठी - अमराठी तर कधी भूमिपुत्रांचे हक्क तर कधी उद्धव - राज…
जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…