Zakir Hussain : उस्ताद झाकीर हुसैन यांच्या मैफिली पुन्हा अनुभवण्याची संधी!

मुंबई : पृथ्वी थिएटर आणि तबलानवाज उस्ताद झाकीर हुसैन यांचे गेल्या चाळीस वर्षांपासूनचे घट्ट ऋणानुबंध जोडले गेले होते. दरवर्षी २८ फेब्रुवारीला उस्ताद झाकीर हुसैन (Zakir Hussain) पृथ्वी थिएटरमध्ये कार्यक्रम करत असत. मात्र गेल्यावर्षी त्यांचे निधन झाले आणि ही परंपरा खंडित झाली. यावर्षी उस्ताद झाकीर हुसैन यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये आजवर रंगलेल्या मैफिली ध्वनीचित्रफितींद्वारे रसिकांना पुन्हा अनुभवता येणार आहेत. ‘गुजिश्ता यादें’ या नावाने होणाऱ्या कार्यक्रमांतर्गत या ध्वनीचित्रफितींद्वारे उस्ताद झाकीर हुसैन यांनी गेल्या वीस वर्षात पृथ्वी थिएटरमध्ये केलेले कार्यक्रम दाखवण्यात येणार आहेत.



पृथ्वी थिएटरच्या संस्थापक जेनिफर केंडल यांचे १९८४ मध्ये निधन झाले, तेव्हापासून त्यांच्या जन्मदिनी २८ फेब्रुवारीला पृथ्वी थिएटरमध्ये उस्ताद झाकीर हुसैन आपला कार्यक्रम सादर करत असत. पहिल्या वर्षी त्यांनी जेनिफर केंडल यांना कार्यक्रम समर्पित केला होता.


२१ आणि २२ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ वाजता आणि रात्री ८ वाजता ध्वनीचित्रफीत दाखवली जाईल. तर २३ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता, सायंकाळी ५ वाजता आणि रात्री ८ वाजता तीन वेगवेगळ्या ध्वनीचित्रफिती पाहायला मिळणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वाने पृथ्वी थिएटर येथे ‘गुजिश्ता यादें’ नावाने उस्ताद झाकीर हुसैन यांच्या मैफिली रसिकांना अनुभवायला मिळतील. (Zakir Hussain)

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल