मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु होती. अखेर या दोघांचा घटस्फोट झाला आहे. धनश्री-युजवेंद्र या दोघांनी आज मुंबई फॅमिली कोर्टात घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, धनश्री-युजवेंद्र हे दोघेही घटस्फोटाच्या अंतिम सुनावणीसाठी आणि सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी वांद्रे येथील फॅमिली कोर्टात उपस्थित होते. न्यायाधीशांनी दोघांनाही काउन्सिलरकडे पाठवलं. दोघांचंही हे सेशन तब्बल ४५ मिनिटं सुरू होतं. यामध्ये दोघांनीही न्यायाधीशांना सांगितलं की, ते १८ महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. दोघांनी कम्पॅटिबिलिटी संबंधित मुद्यांमुळे एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.यावर अखेर न्यायालयानं दोघांच्याही घटस्फोटाला मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे.
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर; शनिवारी होणार वाहतुकीत बदल
युजवेंद्रने आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्यापासूनच धनश्रीनं मागितलेल्या पोटगीच्या चर्चाही होऊ लागल्या होत्या. धनश्री वर्मानं युजवेंद्र चहलकडे तब्बल ६० कोटी रुपयांची पोटगी मागितल्याचं सांगितलं जात होतं.मात्र,घटस्फोटावेळी पोटगीची रक्कम किती ठरली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, चार वर्षांपूर्वी युजवेंद्र आणि धनश्री वर्मानं एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांनीही लव्ह मॅरेज केलं होतं. आणि गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील मतभेदाच्या बातम्या समोर येत होत्या. पण, तरीसुद्धा या जोडप्यानं याबद्दल कधीही उघडपणे बोललं नाही किंवा चर्चाही केलेली नाही.