Wednesday, March 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजUSA Plane Accident : अमेरिकेत दोन विमानाची हवेत धडक, दोघांचा मृत्यू!

USA Plane Accident : अमेरिकेत दोन विमानाची हवेत धडक, दोघांचा मृत्यू!

वॉशिंगटन : अमेरिकेतील अ‍ॅरिझोना याठिकाणी दोन लहान विमानांची हवेत जोरदार धडक झाल्याने मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. टक्सनच्या बाहेरील एका लहान विमानतळावर हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत किमान दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. (USA Plane Accident)

Chhaava : ‘या’ ठिकाणी छावा चित्रपट झाला ‘टॅक्स फ्री’!

मिळालेल्या माहितीनुसार, टक्सनच्या बाहेरील एका विमानतळावर अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार बुधवार (१९ फेब्रुवारी) सकाळी हा अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाल्याचे माराणा पोलिसांनी सांगितले. सेस्ना १७२S आणि लँकेअर ३६० MK II या दोन विमानांमध्ये टक्कर झाली असून दोन्ही दोन्ही फिक्स्ड-विंग, सिंगल-इंजिन विमाने असल्याचे NTSB ने सांगितले. मृतांची ओळख अद्याप पटू शकली नाही.

या अपघाताचा तपास यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डकडून (NTSB) सुरू आहे. स्थानिक अधिकारी आणि तपासकर्त्यांचे एक पथक अपघात कसा झाला आणि तो मानवी चुकीमुळे झाला की तांत्रिक बिघाडामुळे झाला हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अपघात झाला तेव्हा आकाश निरभ्र होते, त्यामुळे हवामानाशी संबंधित कोणतीही समस्या नसल्याचे मानले जात आहे.

अलिकडच्या काळात अमेरिकेत चार मोठे विमान अपघात झाले आहेत. सर्वात अलीकडील घटना म्हणजे टोरंटोमध्ये लँडिंग करताना डेल्टा जेट उलटले. मात्र विमानातील सर्व ८० जणांना वाचवण्यात यश आले. याशिवाय अलास्कामध्ये विमान अपघात झाला. जानेवारीच्या अखेरीस, वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकन एअरलाइन्सचे प्रवासी विमान आणि लष्करी हेलिकॉप्टर यांच्यातील टक्करमध्ये ६७ जणांचा मृत्यू झाला. (USA Plane Accident)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -