Champions Trophy 2025 : कराची स्टेडीयमवर अखेर फडकला भारतीय ध्वज

लाहोर : आज चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे सामने होणाऱ्या स्टेडियम्सवर तिरंगा नसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला कराचीतील नॅशनल स्टेडियमवर भारताचा तिरंगा लावला आहे.


कराची स्टेडीयमवर तिरंगा न लावण्याचा हा वाद झाला तेव्हा पीसीबीने स्पष्टीकरण देताना आयसीसी नियमांचा हवाला दिला होता. बोर्डाने म्हटले की, आयसीसीने त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फक्त चार ध्वज फडकवण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामध्ये आयसीसी, पीसीबी आणि दोन सहभागी संघांचा समावेश आहे.पण, त्यावरून पीसीबीला टीकेचा सामना करावा लागला आणि अखेर मंगळवारी राष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय ध्वज दिसला.



बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही यावर सांगितले की, इतर सहभागी देशांसोबत भारतीय ध्वजही फडकवला पाहिजे "प्रथम, भारतीय ध्वज तिथे होता की नाही याची खात्री करावी. जर तो तिथे नव्हता, तर तो लावायला हवा होता. सर्व सहभागी देशांचे ध्वज तिथे असायला हवे होते," असे राजीव शुक्ला यांनी मंगळवारी सांगितले होते.


तिरंगी मालिकेत पाकिस्तानला न्यूझीलंडकडून दुहेरी पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे पाकिस्तानचा संघ विजयी सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असेल. २३ फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा सामना भारताशी होईल आणि तोही सोपा सामना नसेल. जर पाकिस्तान दोन्ही सामने गमावले तर ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडतील.


Comments
Add Comment

Plane Crashes : बीजिंगमध्ये हाहाकार! १७०० फुटी 'चायना झुन' टॉवरमध्ये घुसलं विमान

बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीला विमानाची जोरदार धडक   चीन: चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) शुक्रवारी एक

India-Nepal Trade : भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला भारताच्या नव्या नियमांमुळे नेपाळच्या व्यापारावर परिणाम नवी दिल्ली : भारत आणि

Venezuela Earthquakes : व्हेनेझुएलात आलेल्या दोन भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी, भूकंपानंतरचे भयावह फोटो, व्हिडीओ होऊ लागले व्हायरल

कॅराकस : व्हेनेझुएलात बुधवारी ४० सेकंदांच्या अंतराने दोन मोठे भूकंप झाले. पहिला भूकंप ७.२ रिश्टर क्षमतेचा तर

Strait of Hormuz : ३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली ; तेल, वायू अन् खतांचा जहाजात समावेश, २० हून अधिक जहाजे रांगेत

३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका यांच्यातील सामंजस्य

US-Iran Final Agreement : अमेरिका-इराण अंतिम कराराशिवाय अणुस्थळांची तपासणी नाही; IAEA ला इराणचा स्पष्ट इशारा

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामानंतर अणु कार्यक्रमाच्या भवितव्याबाबत चर्चा वेगाने सुरू असताना

Ebola Virus France : धक्कादायक! फ्रान्समध्ये इबोलाचा पहिला रुग्ण आढळला; जगभरात २५० हून अधिक मृत्यू

नवी दिल्ली : जगभरात पुन्हा एकदा इबोला विषाणू (Ebola Virus) चिंतेचा विषय ठरत आहे. काँगो (Congo) आणि युगांडा (Uganda) येथे उद्रेक