Nepal Flood : नेपाळवर घोंगावत आहे पुन्हा महापुराचे संकट

काठमांडू : हिमस्खलन झाले, नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि नेपाळमध्ये अचानक महापूर (Flash Flood) आला. या संकटातून सावरण्याआधीच नेपाळवर पुन्हा महापुराचे संकट घोंगावत आहे. तिबेटमधील छोचेन आणि पुरेपु या नद्यांच्या संगमाजवळ भूस्खलनामुळे तयार झालेल्या विशाल बॅरियर तलावात प्रचंड पाणी साचले असून, हा तलाव आता ओव्हरफ्लो होऊ लागल्याने पुढील ७२ तास नेपाळसह सीमावर्ती भागासाठी अत्यंत विनाशाचे आणि चिंतेचे ठरणार आहेत. या नैसर्गिक तलावामध्ये आतापर्यंत तब्बल २० लाख घनमीटर पाणी जमा झाले आहे. विशेष म्हणजे, या परिसरात अजूनही सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आगामी तीन दिवसांत आणखी सुमारे ३० लाख घनमीटर पाणी तलावात भरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या प्रचंड पाणीसाठ्यामुळे तलावाच्या नैसर्गिक बांधावरील ताण कमालीचा वाढला आहे. हा बांध अचानक तुटल्यास पाण्याचा महापूर थेट भोटेकोशी आणि त्रिशूली नदीच्या पात्रात येऊन मैदानी भागांमध्ये अभूतपूर्व विनाश घडवून आणू शकतो. या संभाव्य धोक्याची गंभीर दखल घेत नदीकाठच्या आणि सखल भागातील हजारो नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. (Nepal Flood)


यापूर्वी आलेल्या विदारक महाप्रलयात नेपाळमध्ये मृतांचा आकडा ५३८ च्या वर पोहोचला असून, १,५४५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. चितवन, रसुवा, गोरखा, नुवाकोट आणि धाडिंग या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. या विनाशकारी संकटात अनेक परदेशी नागरिकांसह भारतीय पर्यटकही मोठ्या संख्येने अडकले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, ४०० भारतीय नागरिक सुखरूप असले, तरी १७८ ते ३२० दरम्यान भारतीय नागरिक अद्यापही बेपत्ता किंवा संपर्काबाहेर आहेत. त्यांच्या शोधार्थ आणि सुटकेसाठी नेपाळचे सैन्य आणि बचाव पथके अतोनात प्रयत्न करत आहेत. (Nepal Flood)



आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेता चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी नेपाळ सीमेवरील आपत्तीग्रस्त गिरोंग टाउनशिपला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न कमांडला मदतकार्याचे कडक निर्देश दिले आहेत. चीन आणि नेपाळचे वैज्ञानिक आधुनिक उपग्रहांच्या साहाय्याने तिबेटमधील या कृत्रिम तलावाच्या पाण्याच्या पातळीवर आणि नैसर्गिक बांधाच्या स्थितीवर चोवीस तास बारीक नजर ठेवून आहेत.


चीनच्या सिचुआन प्रांतात झालेल्या ५.१ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे या पर्वतीय भागातील भूगर्भिय हालचाली वाढल्या असून, अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेच्या मते हिमनदी कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या ढिगाऱ्याच्या प्रवाहामुळे हा धोका अधिकच तीव्र झाला आहे. या आपत्तीमुळे चीन-नेपाळ सीमेवरील वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. मुख्य फ्रेंडशिप ब्रिज आणि रसुवागढी बॉर्डर पोस्टचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक रस्ते वाहून गेले असून, वीज आणि दूरसंचार व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. (Nepal Flood)



पुराच्या संकटात भारतीय नागरिकही अडकले आहेत. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, पूरग्रस्त भागात अडकलेल्या किंवा संपर्काबाहेर असलेल्या लोकांमध्ये सुमारे २८८ भारतीय पर्यटकांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नेपाळ पोलिसांकडून विविध जिल्ह्यांमध्ये बचावकार्य सुरू आहे. रसुवा, नुवाकोट, धाडिंग, चितवन आणि गोरखा या भागांतून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. (Nepal Flood)


अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेच्या प्राथमिक माहितीनुसार, हिमनदी कोसळणे आणि त्यातून निर्माण झालेल्या ढिगाऱ्याच्या प्रवाहामुळे भूकंपीय हालचाल झाली आणि नेपाळ व तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंसक परिणाम झाले. सुरुवातीच्या अहवालांमध्ये भूकंपामुळे हिमस्खलन होऊन पूर आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नंतर युएसजीएसने भूकंपीय हालचाली हिमनदी कोसळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट केले.


नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडमध्ये मृतांचा आकडा शुक्रवारी ५३८ च्या वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत १,५४५ जण जखमी झाले असून त्यांची सुटका करण्यात आली आहे. नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, चितवन जिल्ह्यात सर्वाधिक १७८ मृतदेह सापडले आहेत. त्यानंतर एनपी ईस्टमध्ये ११०, गोरखामध्ये ४४, नुवाकोटमध्ये ३७, धाडिंगमध्ये ३३, तनहूनमध्ये २८, एनपी वेस्टमध्ये २७ आणि रसुवामध्ये १२ मृतदेह आढळले आहेत. नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खानाल यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅश फ्लडनंतर जवळपास ३०० भारतीय पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती होती. मात्र, नेपाळ पर्यटन मंडळाच्या ताज्या माहितीनुसार १७८ भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये एकूण ८२६ आणि तिबेटमध्ये ५५८ जण बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Nepal Flood)

Comments
Add Comment

Nepal Flood : नेपाळमधील महापुराचा भारताला फटका, जलविद्युत प्रकल्पांच्या ऊर्जा निर्मितीवर परिणाम

काठमांडू : भारत आणि नेपाळ यांच्यात ऊर्जा सहकार्य करार आहे. या करारांतर्गत नेपाळमधील जलविद्युत प्रकल्पांमधून

Mohan Bhagwat : मोहन भागवतांना विरोध करणाऱ्या ममदानींचे संघांने टोचले कान, आयोजकांचे एक्स अकाऊंटही पुन्हा सुरू

न्यूयॉर्क : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दृष्टी आणि विचारसरणी यांविषयी अधिक जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या

Tibet dam failure alert : चिखलात बेपत्तांचा शोध अन् मदतकार्य सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा इशारा; तिबेटमध्ये पाण्याचा बांध फुटल्याची भीती

नेपाळ : नेपाळमध्ये तिबेटच्या हिमकडा कोसळण्याने आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडच्या विनाशातून सावरण्याचा प्रयत्न सुरू

Nepal Flood: नेपाळमध्ये 290 नागरिक संपर्कात नाहीत, पण तिबेटमध्ये...; केंद्र सरकारने दिली ही बातमी

Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नेपाळ-चीन सीमावर्ती भागात

Hyperdontia Case : ११ वर्षाच्या मुलीच्या तोंडात असं काही पाहून डॉक्टरही झाले हैराण; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

Hyperdontia Case : दातदुखीच्या त्रासामुळे ११ वर्षांच्या मुलीला दंतवैद्याकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान

Nepal Flash Flood China : नेपाळमधील महापुरामागे ‘मेड इन चायना’चा हात? शी जिनपिंग यांच्या धोरणांवर गंभीर आरोप

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठी हानी झाली. तिबेटच्या दिशेने