सनई-चौघड्यांच्या मंगलमय सुरांसह पुण्यात अवतरली शिवसृष्टी

५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळासह हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी केला जय शिवाजी, जय भवानीचा जयघोष


पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ... एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्याचे, वीर मातांचे स्फुर्ती देणारे ९६ स्वराज्यरथ... महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना... ५१ रणशिगांची ललकारी... नादब्रह्म ट्रस्ट ढोल-ताशा पथकाचा रणगजर... सनई-चौघड्यांचे मंगलमय सूर... हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुन:श्च एकदा बुधवारी पुण्यामध्ये अवतरला.

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समिती, पुणेतर्फे लालमहाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्य-दिव्य मिरवणुकीचे. सोहळ्याचे उद्घाटन शिवरायांचे वंशज श्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलीस उपायुक्त विशेष शाखा मिलींद मोहिते, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस उपायुक्त संदीप गिल्ल, दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने जेविधीज्ञ प्रताप परदेशी उपस्थित होते. तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीचे यंदा १३वे वर्ष आहे.



छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. शिवाजी महाराजांचा विचार आजही पाहायला मिळत आहे. पुण्यात शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत आहेत. यानिमित्ताने शिवरायांसोबत असलेले सरदार, मावळे यांचे स्मरण होत असल्याचे त्यांनी सांगितले. मोहोळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता, त्यावेळी प्रत्येक पायरीवर त्यांना स्वराज्यातील सरदार व मावळ्यांची आठवण झाली. स्वराज्य स्थापनेमध्ये शिवरायांसोबत असलेले सरदार व मावळे यांचे स्मरण या सोहळ्याच्या निमित्ताने केले जात आहे.

शिवरायांच्या पुतळ्यावर हेलीकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी

ईशान अमित गायकवाड यांनी सलग १४ व्या वर्षी शिवजयंती १९ फेब्रुवारीला शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारूढ स्मारकावर हेलीकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी केली.
Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात