Devendra Fadanvis : 'छत्रपतीचे १२ किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र होणार'- मुख्यमंत्री फडणवीस

पुणे : छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातीच्या सामान्य मावळ्यांना एकत्र करत देव, देश, धर्म व रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली, त्यामुळे लाखोंची फौज घेऊन येणाऱ्या मुघलांनाही केवळ पाच हजार मावळे परास्त करायचे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या प्रमुख उपस्थितीत 'जय शिवाजी-जय भारत' पदयात्रेचा शुभारंभ पुणे येथे झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत उपस्थितांना संबोधित केले.


यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव केवळ भारतामध्ये नाही तर जगातील २० देशांमध्ये साजरा केला जातो. ज्यावेळी भारतातील अनेक मोठे राजे मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारून त्यांच्यासोबत काम करत होते, अशा परिस्थितीमध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवरायांना मराठी मुलखाला व हिंदुस्थानला स्वतंत्र करायचे आहे, अशी शिकवण दिली.



छत्रपती शिवाजी महाराज यांचे १२ किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र होणार आहेत. राज्यकर्ते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेली करांची रचना, शेतकरी हिताची कामे, जल, जंगल संवर्धन, अभेद्य तटबंदी, आरमार, समुद्रकिनाऱ्यांचे व्यवस्थापन, समुद्री सुरक्षा अशी प्रत्येक बाब महाराजांनी आपल्याला शिकविली. सामान्य माणूस, महिलांचे कल्याण, सन्मान यांचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला. त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. एक मजबूत भारत, बलशाली भारत निर्माण करण्यासाठी 'जय शिवाजी-जय भारत' ही पदयात्रा आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खा. मेधा कुलकर्णी, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार, मंत्री दत्तामामा भरणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या