खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या बाजूच्या फुडमॉल हॉटेलसह इतर हॉटेल, पेट्रोल पंपातील सांडपाणी पातळगंगा नदीत सोडले जात असल्यामुळे नदी दूषित झाली आहे. पातळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आवाज उठविला जात असतानाही हॉटेल चालकांवर कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. पातळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरूण जाधव यांनी हॉटेल मालकांविरोधात राष्ट्रीय हरित लवदाकडे तक्रार करणार असल्याचे इशारा दिला आहे.
Chava Screening : ‘छावा’ चित्रपट सुरू असतानाच प्रेक्षकाने फाडला थिएटरचा पडदा
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाका शेजारी मुंबईकडून पुण्याला जाताना फूड वे मॉल्स आहे, ते मुंबई-पुणे ट्रक टर्मिनल यांच्या लायसेन्स वर आपले फूड मॉल्स चालवत आहेत. त्यांनी स्वतंत्र परवाना घेणे आवश्यक आहे. १४ जानेवारी रोजी पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव फूड मॉल्स चे सांडपाणी पाताळगंगा नदी मध्ये जात आहे. त्याचे व्हिडिओ आणि फोटो देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना तक्रार केली होती. २८ जानेवारी रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाने थातुरमातुर कारवाई केली होती. १५फेब्रुवारी रोजी पहाणी केली असता एचपी पंपाच्या अखत्यारीतील उडपी हॉटेल आपले सांडपाणी अजूनही पाताळगंगा नदी मध्ये सोडत असल्याचे निदर्शनास आल्याचे अरूण जाधव यांनी सांगितले आहे.