Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीनवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी, १८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी, १८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली: नवी दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. ही घटना रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४ वर ही घटना घडली.

घटनेच्या वेळेस हजारोच्या संख्येने भक्तगण प्रयागराज महाकुंभ येथे जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर एकत्रित जमले होते. तसेच रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. घटनेची सूचना मिळताच दिल्लीच्या एलजी वीके सक्सेना आणि माजी मुख्यमंत्री आतिशी जखमींची विचारपूस कऱण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.

कधी घडली ही दुर्घटना?

चेंगराचेंगरीची ही दुर्घटना दहा वाजण्याच्या सुमारास घडली. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने लोक जमले होती. पोलीस उपायुक्तांच्या माहितीनुसार, जेव्हा प्रयागराज एक्सप्रेस रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक १४वर उभी होती तेव्हा मोठ्या संख्येने लोक तेथे उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस उशिराने धावत होती आणि या रेल्वेचे प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक १२, १३ आणि १४ वर होते.

रेल्वे पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी जखमींना एलएनजेपी आणि लेडी होर्डिंग रुग्णालयात दाखल केले. तर गर्दी आणि हंगामामुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. रेल्वे म्हटले, ही घटना महाकुंभसाठी हजारो भक्त प्लॅटफॉर्मवर एकत्रित आल्याने घडली.

पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृ्यू झाला. या घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी एक्सवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीमुळे व्यथित झालो आहे. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींना लवकर बरे करण्याची देवाला प्रार्थना करतो. तसेच या सर्व लोकांना सर्वतोपरी मदत करावे असे अधिकाऱ्यांना सांगतो.

राष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दु:ख व्यक्त केले आहे. एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. मी या चेंगराचेंगरीत बळी ठरलेल्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करते.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -