

पुणे : हडपसरमधील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये नवव्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेने फ्लॅटमध्ये ३५० मांजरी पाळल्याचे उघड झाले ...
हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्लीचा भावी मुख्यमंत्री २० फेब्रुवारी २०२५ रोजी रामलीला मैदानावर संध्याकाळी भव्य सोहळ्यात पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहे. या सोहळ्यासाठी किमान ३० हजार जणांना आमंत्रण दिले जाणार आहे. सोहळ्यासाठी ४० फूट बाय २४ फूटचा मोठा मंच आणि दोन ३४ बाय ४० फुटांचे मंच उभारले जाणार आहेत. मंचावर १०० ते १५० जणांसाठी बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

प्रयागराज (वृत्तसंस्था): उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळा सुरू आहे. १३ जानेवारीपासून या महाकुंभ मेळ्याला प्रारंभ झाला. ...
फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या विधानसभेसाठी निवडणूक झाली. विधानसभेच्या ७० पैकी ४८ जागा भारतीय जनता पार्टीने आणि २२ जागा आम आदमी पार्टीने जिंकला. काँग्रेस पक्ष सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत एकही जागा जिंकू शकलेला नाही. दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीचा पराभव करणाऱ्या भाजपाने दणदणीत विजय मिळवला. हा विजय मिळाला तरी भाजपाने अद्याप मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही.

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये सोमवारी भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले. काही सेकंदापर्यंत जमीन हलत होती. लोक भयभीत झाल्याने घराच्या बाहेर निघाले. राष्ट्रीय ...
दिल्लीच्या मुख्यमंत्री या पदासाठी भाजपात सध्या सात नावांची चर्चा आहे. प्रवेश वर्मा, आशीष सूद, रेखा गुप्ता, विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, जितेंद्र महाजन, शिखा रॉय या सात जणांपैकी एकाच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री म्हणून होण्याची शक्यता आहे. भाजपाची सोमवारी १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी एक बैठक होणार आहे. या बैठकीत नेता निवडीच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील भाजपा सरकारमध्ये किती सदस्यांचे मंत्रिमंडळ असेल तसेच कोणाकोणाला मंत्री करावे याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेच्या दुसऱ्या दिवशी, उत्तर रेल्वेने येणाऱ्या काळात अशा प्रकारची ...
भाजपा १९९३ नंतर पहिल्यांदाच दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. त्यांनी मागील १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीचा पराभव केला आहे. यामुळे भाजपासाठी दिल्लीतल्या विजयाला विशेष महत्त्व आहे.