Water supply : येत्या सहा महिन्यांत चेंबूर, गोवंडी, देवनारमधील पाणीपुरवठ्यात होणार सुधारणा

  36

जलबोगद्याचे काम होणार सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण


मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या (Water supply) जलवाहिन्यांमध्ये सुधारणा करून भुमिगत जलबोगद्यांमध्ये रुपांतर केले जात आहे. त्यानुसार चेंबूरमधील अमर महल ते ट्रॉम्बे जलाशयापर्यंत सुमारे साडेपाच किलोमीटर लांबीचा जलबोगद्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या जलबोगद्याचे काम सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या सात महिन्यांमध्ये चेंबूर, गोवंडी, देवनार,शिवाजी नगर आदी भागांमधील पाणी पुरवठ्यात मोठी सुधारणा होणार आहे. त्यामुळे या भागांतील पाणी समस्या येत्या काही महिन्यांमध्ये सुटणार आहे.


बोगदा खोदाई यंत्राद्वारे अमर महल (चेंबूर) ते ट्रॉम्बे उच्चस्तर जलाशयापर्यंत एकूण ५.५० किमी लांबीच्या जलबोगदा खोदाई तसेच आरसीसी अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या स्थितीत भूस्तरावरील जलवाहिन्या टाकण्याचे काम प्रगतीपथावर असून येत्या सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे महापालिका जलअभियंता विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे या जलबोगद्याचे काम पूर्ण होवून प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यानंतर महापालिकेच्या एम पूर्व म्हणजे देवनार, गोवंडी, शिवाजीनगर,, मानखुर्द आणि एम पश्चिम विभागातील चेंबूर आदी भागांमधील पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार आहे.



देवनार, गोवंडी, शिवाजी नगरसह चेंबूर भागात सध्या अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत असून या भागातील पाणी समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत. या भागांत पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनी असल्या तरी योग्य दाबाने पाण्याचा पुरवठा करण्यात अडचणी येतात. त्यामुळे जलबोगदा तयार झाल्यानंतर या भागाला अधिक दाबाने पाण्याचा पुरवठा केला जावू शकतो, परिणामी या भागातील पाणी समस्या मोठ्याप्रमाणात कमी होण्यास मदत होईल,असे जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.



कुर्ला ते भायखळापर्यंतच्या पाणी पुरवठ्यात एप्रिल २०२६ पर्यंत सुधारणा

मुंबई महापालिकेने हेगडेवार उद्यान चेंबूर अमरमहल ते प्रतीक्षा नगर आणि पुढे सदाकांत ढवण उद्यान या परेल पर्यंतच्या जलबोगद्याचे काम मागील काही वर्षांपासून हाती घेण्यात आले असून हे काम येत्या एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण अपेक्षित असल्याचे जलअभियंता विभागाने स्पष्ट केले. एकूण ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे काम पूण्र्णझाले असून पहिल्या टप्प्यात अमरमहल ते प्रतीक्षा नगर शीव वडाळापर्यंतच्या अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, दुसऱ्या टपप्यात प्रतीक्षा नगर ते परेल पर्यंतचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम एप्रिल २०२६ रोजी पूर्ण होवून प्रत्यक्षात या जलबोगद्यातून पाणी पुरवठा झाल्यास याचा लाभ महापालिकेच्या एल विभागातील कुर्ला, चुनाभट्टी, एफ उत्तर या विभागातील शीव ते वडाळा आणि एफ दक्षिण विभागातील परळ ते लालबाग आणि ई विभागातील भायखळा आदी विभागातील पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार आहे.

Comments
Add Comment

पवई तलावातील सांडपाण्याचा प्रवेश मार्ग कायमचाच बंद

मुंबई : पवई तलावामध्ये येणारे सांडपाणी आदींवर अखेर बंद केले जाणार असून पवई तलावाच्या सुशोभीकरणाच्या शेवटच्या

भविष्यकाळात वीजदरात आणखी होणार घट

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे प्रतिपादन मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात

मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, ५ जुलैला मुंबईत एकच अन् एकत्र मोर्चा निघणार; राऊतांची घोषणा

मुंबई : हिंदी भाषेच्या सक्तीविरीधात ठाकरे बंधू एकत्र येणार असं राज्यसभा खाजदार संजय राऊत यांनी एक्स पोस्टद्वारे

सासरचा मान घटस्फोटापर्यंत मिळणे हा प्रत्येक पत्नीचा अधिकार, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई (प्रतिनिधी) : पत्नी जर सासरी ऐशारामात राहिली असली तरी तिला तशाच प्रकारचे राहणीमान सासर सोडल्यानंतर

आषाढीनिमित्त मध्य रेल्वे तीन एकेरी विशेष गाड्या चालवणार

मुंबई (प्रतिनिधी): पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी मध्य

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील काही भागात आजपासून चार दिवस जोरदार पाऊस बरसणार असल्याचं भारतीय हवामान खात्याच्या मुंबई