कोकण रेल्वे मार्गावर महाकुंभ मेळ्यासाठी विशेष रेल्वे गाडी

रत्नागिरी : प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्याला जाण्याकरिता कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. उडुपी ते प्रयागराज जंक्शन आणि परत या मार्गावर ही गाडी धावेल. त्याचा तपशील असा - गाडी क्र. ०११९२ उडुपी टुंडला जंक्शन गाडी सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजता उडुपी येथून सुटेल.


ही गाडी टुंडला जंक्शनला तिसऱ्या दिवशी (बुधवार, १९ फेब्रुवारी) दुपारी १ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाला गाडी क्र. ०११९१ गाडी तुंडला जंक्शन येथून गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी शनिवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी उडुपीला पोहोचेल.


ही गाडी बारकुर, कुंदापुरा, मुकांबिका रोड, बयंदूर, भटकळ, मुर्डेश्वर, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव जंक्शन, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, पिपरीया, मदनीक, माणिकपूर, जं. प्रयागराज जंक्शन, फतेहपूर, गोविंदपुरी आणि इटावा स्टेशन येथे थांबेल.गाडीला एकूण २० डबे असतील. त्यातील 2 टायर एसी १ कोच, 3 टायर एसी ५ कोच, -स्लीपर १० कोच, जनरल – २ आणि एसएलआर २ कोच असतील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

Comments
Add Comment

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!