मुंबई : साहित्याचा ठसा आता दिल्लीत उमटणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन मुंबई मराठी पत्रकार संघाने दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळी आयोजित केले आहे.
संमेलनाची आमंत्रक संस्था सरहद आणि संस्थेचे प्रमुख संजय नाहर यांनी या आयोजनासाठी सहकार्याचा हात पुढे केला आहे. दिल्लीत तालकटोरा स्टेडियम येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत संपन्न होणाऱ्या साहित्य संमेलनात पत्रकार संघाचा स्टॉल साहित्यप्रेमींचे लक्ष वेधून घेणार आहे. पत्रकार संघाचे सदस्य असलेल्या पत्रकारांनी लिहिलेले प्रत्येकी एक पुस्तक या स्टॉलवर असावे, असे आयोजन करण्यात येत आहे. या स्टॉलची जबाबदारी पत्रकार संघाचे अंतर्गत हिशोब तपासनीस प्रा. हेमंत सामंत आणि सदस्य राजेंद्र साळस्कर सांभाळणार आहेत. या प्रदर्शनात मांडण्यासाठी सदस्यांनी स्वलिखित पुस्तकांपैकी कुठल्याही एकाच पुस्तकाची प्रत’ १६ फेब्रुवारीपर्यंत मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आणून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…