१६ वर्षांच्या संघर्षानंतर मिळणार हक्काचे घर; गोरेगाव पत्राचाळीतील रहिवाशांची घराची प्रतीक्षा संपली

मुंबई : गोरेगावमधील पत्राचाळीतील रहिवाशांचा मागील १५ ते १६ वर्षांपासून घरांसाठी संघर्ष सुरु होता. म्हाडाकडून पत्राचाळ पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले आहे. २०२२ पासून म्हाडाकडून याचे बांधकाम सुरु होते. आता ते पूर्ण झाले असून लवकरच पत्राचाळीतील ६७२ रहिवाशांच्या घरांची प्रतिक्षा संपणार आहे. येत्या मार्च महिन्यामध्ये या रहिवाशांना या घरांचा ताबा मिळणार आहे.


पत्राचाळीच्या रहिवाशांना घरांसाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. सोबतच विकासकांनी केलेल्या परवडीनं त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. आता त्यांचा संघर्ष संपला असून त्यांना हक्काची घरे देण्यात येणार आहेत. पत्राचाळीतील रहिवाशांसाठी १६ इमारतीत २.५ बीएचकेचे ६५० चौ.फुटाचे घर आणि त्याला ११७ चौ.फुटाची बाल्कनी देण्यात आली आहे. सोबतच, सुसज्ज असे दोन मजली पार्किंग, दोन गार्डन परिसर, फिटनेस सेंटर आणि मेडिटेशन सेंटर देखील देण्यात आले आहेत.



पुढील महिन्यात पत्राचाळीतील रहिवाशांना चाव्या देण्यासंदर्भात कार्यक्रम केला जाऊ शकतो. मात्र, म्हाडाकडून दिलेली कमिटमेंट पूर्ण न केल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. म्हाडाने इमारतीच्या ठिकाणी ७२ कमर्शिअल दुकाने बांधल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.



असे असेल पत्राचाळीतील घर


- पत्राचाळीच्या जागेवर जवळपास १६ इमारतींची उभारणी.
- या इमारतीतील घर ६५० चौ.फुटाची असून ११७ चौ. फुटाची अतिरिक्त बाल्कनी देखील याला देण्यात आली आहे.
- अडीच हजार चौ.फुटांचे दोन कम्युनिटी हॉलची देखील उभारणी केली गेली आहे.
- दोन मजली पार्किंग, जिमनॅशियम, मेडिटेशन सेंटर आणि लहान मुलांना खेळण्यासाठीची सोय देखील केली गेलीय.
- प्रत्येक विंगला दोन लिफ्ट आणि एक स्टेअरकेसची उभारणी आहे.
- प्रत्येक फ्लॅटधारकाला एका पार्किंगची व्यवस्था देखील केली गेली आहे.

Comments
Add Comment

भिवंडीतील ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा; १० एकर जागेवर विशेष व्यवस्था, मंत्री मेघा बोर्डीकर यांची घोषणा

नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा मुंबईपर्यंतचा विस्तार आणि ठाणे-भिवंडी परिसरातील

मुंबईतील गोरेगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तोडले महिलांच्या गालांचे लचके

मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने महिलांच्या गालांचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगावमध्ये

काळा घोडा परिसराचे सुशोभीकरण, महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला परिसर म्हणून काळा घोडा

विलेपार्ल्यात महायुतीचा जोर, उबाठा आणि काँग्रेसच्या उमेदवारांसमोर आव्हान

चित्र पालिकेचे विलेपार्ले विधानसभा  मुंबई (सचिन धानजी) : उत्तर मध्य मुंबईतील विलेपार्ले विधानसभा क्षेत्रात

मुंबई पागडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र नियमावली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची घोषणा मुंबई : मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी

पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत