कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी


मुंबई : मुंबईची नैसर्गिक संरक्षक भिंत समजल्या जाणाऱ्या कांदळवनांवर भू-माफियांनी डल्ला मारला असून, बोरीवलीत सुमारे ५० एकर कांदळवनांची कत्तल करून तिथे अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि झेप्टोसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची बेकायदा गोदामे उभारण्यात आल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी गुरुवारी विधानसभेत केला. या प्रकरणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.


या गंभीर तक्रारीची दखल घेत, 'गुगल मॅपिंग'च्या आधारे जुन्या नकाशांची पडताळणी करून चौकशी केली जाईल आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात दिले. उपाध्याय यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, बोरीवलीच्या बोरकर कंपाऊंड परिसरात हे अतिक्रमण झाले आहे. या ठिकाणी कांदळवने तोडून मोठा भराव टाकण्यात आला असून तिथे पत्र्याची गोदामे आणि ताडपत्र्यांचे गाळे उभारले आहेत. विशेष म्हणजे, या जमिनीवर पिढ्यानपिढ्या मासे सुकवण्याचे काम करणाऱ्या स्थानिक मच्छिमार बांधवांना आणि तिथे खेळणाऱ्या मुलांना आता बाऊन्सर्समार्फत दमदाटी केली जात आहे. लोकप्रतिनिधी पाहणीसाठी गेले असता त्यांनाही बाऊन्सर्सच्या अरेरावीचा सामना करावा लागल्याचे उपाध्याय यांनी नमूद केले.


अतिक्रमित जमिनींवर गोहत्या


महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी एस. जी. कवठे हे या अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत उपाध्याय यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली. "एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना दुसरीकडे संबंधित जमिनीवर गोहत्येसारखे प्रकारही घडत आहेत," असा गंभीर दावाही त्यांनी यावेळी केला. आमदार मनिषा चौधरी यांनीही या प्रश्नी आक्रमक पवित्रा घेत कांदळवन कत्तल रोखण्यासाठी महसूल आणि वन विभागाची संयुक्त समिती स्थापन करण्याची मागणी केली.


उच्चस्तरीय बैठक घेणार - वनमंत्री


वनमंत्री गणेश नाईक यांनी उत्तरात स्पष्ट केले की, "विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर वन, महसूल, महानगरपालिका आणि पोलीस दलातील उच्चाधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली जाईल. या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित केले जाईल. कांदळवनांचे नुकसान झाले असल्यास सॅटेलाईट इमेज आणि गुगल मॅपिंगच्या आधारे सत्य शोधून काढले जाईल."

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा