Shirdi News : पुढील चार दिवस रात्री अकरा नंतर शिर्डी बंद!

  106

नाशिक : दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहराची सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्थेसंबंधी निर्णय घेण्यात येणार असून याच पार्श्ववभूमीवर पुढील चार दिवस रात्री अकरा नंतर शिर्डी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. वाढती गुन्हेगारी लक्षात घेता त्यावर उपाययोजना आखण्यात येणार आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीत गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईवर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे एक स्थायी पथक शिर्डीत नियुक्त करण्यात आले आहे. आठ जणांचे हे पथक येथील गुन्हेगार आणि त्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवून राहणार आहे. तसेच शिर्डीत राहणाऱ्यांचे आधार, रेशनकार्ड यांची चौकशी नगरपालिकेकडून करून घेण्यात येणार आहे. यात काही चुकीचे आढळून आले तर संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. शिर्डी शहरात पोलिसांच्या रेकॉर्डवर लहानमोठे ११४ तर १२ सराईत गुन्हेगार आहेत. यातील १३ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे; तर १३ जणांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. अन्य जिल्ह्यांतून तडीपार केल्या जाणाऱ्या गुन्हेगारांना यापुढे शिर्डीत आश्रय देऊ नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.



डॉ. विखे काय म्हणाले ?


डॉ. विखे म्हणाले ‘रात्री अकरा वाजता साईबाबांची आरती संपल्यानंतर शिर्डी पूर्णपणे बंद राहणार असल्याची सूचना पुढील चार दिवस गावात दवंडी देऊन दिली जाईल. त्यानंतर या निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाईल. रात्री साडेअकरा वाजता सर्व हॉटेल बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेत झाला आहे. शिर्डीत राहणाऱ्यांचे आधार, रेशनकार्ड यांची चौकशी नगरपालिकेकडून करून घेण्यात येणार आहे. यात काही चुकीचे आढळून आले तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. साईप्रसादालयातील भोजनावरून आपल्यावर टीका झाली. मात्र, यासंबंधी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे शिर्डी बाहेरच्या लोकांची टीका आणि सल्लेही ऐकून घेतले जाणार नाहीत. येथील ग्रामस्थांच्या पुढाकारातून आणि गरजेनुसार निर्णय घेतले जातील,’ असेही विखे म्हणाले.

Comments
Add Comment

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

शेफालीचा पती करतो काय ?

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनेविश्वात सध्या शोककळा पसरली आहे.वयाच्या अवघ्या

Warren Buffett Donation: आणखी एक ! ९४ वर्षीय वॉरन बफे यांची ६ अब्ज डॉलरची देणगी! २० वर्षांतील सर्वात मोठी....

प्रतिनिधी: एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व सध्या जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत वॉरन बफे (Warren Buffett) यांनी गेल्या

शेफालीने सलमान-अक्षयच्या चित्रपटातून केले होते बॉलिवूडमध्ये पदार्पण

शेफाली जरीवाला यांनी 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांटा लगा' या पॉप गाण्यामुळे अमाप लोकप्रियता मिळवली. हे गाणे

Woman Kirtankar Murder: महिला कीर्तनकारची आश्रमात दगडाने ठेचून हत्या, संभाजीनगर हादरले

संभाजीनगर: वैजापुरातील एका आश्रमात महिला कीर्तनकाराची अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून निर्घृण हत्या (Woman Kirtankar Murder)

Asian Paints Acquisition: ब्रेकिंग! एशियन पेंटसने White Leak डेकोर कंपनीचे संपूर्ण अधिग्रहण केले

प्रतिनिधी: देशातील सर्वात मोठ्या रंग उत्पादन कंपनीपैकी एक एशियन पेंटस (Asian Paints) कंपनीने लाईटिंग घर सजावट कंपनी (Home Decor)