Wednesday, March 26, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकमविप्रचे सटाणा महाविद्यालय विद्यापीठात सर्वोत्कृष्ट

मविप्रचे सटाणा महाविद्यालय विद्यापीठात सर्वोत्कृष्ट

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित सटाणा येथील कर्मवीर आबासाहेब तथा नारायण मन्साराम सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथे आयोजित शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी राज्याचे शालेय उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पद्मश्री डॉ. शंकर अभ्यंकर, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, संचालक डॉ. प्रसाद सोनवणे, ॲड. आर. के. बच्छाव, शालनताई सोनवणे, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय मेधणे, प्राध्यापकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते.

Biometric attendance : कॉलेज विद्यार्थ्यांचीही आता बायोमेट्रीक हजेरी घेणार!

प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांच्या नेतृत्वाखाली नावीन्यपूर्ण उपक्रम, अनोखे संशोधन, उत्कृष्ट निकालाची परंपरा राखल्यामुळे महाविद्यालयाची पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तीन जिल्ह्यांमधून निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार ग्रामीण भागातील अव्यावसायिक महाविद्यालय या श्रेणीमध्ये देण्यात आला आहे. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि दीड लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, पदाधिकारी, प्राचार्य व प्राध्यापकवृंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कार वितरणप्रसंगी उपप्राचार्य डॉ. नरेंद्र निकम, समन्वयक डॉ. राजेंद्र वसईत, डॉ. साहेबराव कांबळे, डॉ. एस. बी. आंधळे, प्रा. निलेश पाटील, प्रा. अमित निकम, डॉ. आर. बी. अहिरे, प्रा. तुषार खैरनार, प्रा. स्वप्निल शेंडगे, प्रा. सागर माने, प्रा. आदेश राऊत, प्रा. संदीप कुरकुटे, दीपक वाघ व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मविप्र संस्थेने सुरू केलेले बागलाण तालुक्यातील हे पहिले महाविद्यालय आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे पाठबळ, शिक्षकांंचे कठोर परिश्रम, त्यांंनी प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आणि विद्यार्थी-पालकांचे सहकार्य यामुळे अशा प्रकारचे यश गाठणे शक्य आहे. – ॲॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र

सटाणा महाविद्यालयाला गेल्या वर्षीच विद्यापिठाच्या नॅक कमिटीतर्फे ‘ए’ मानांकन मिळालेले आहे. मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा या अभियानांतर्गत तालुकास्तरावर पहिले आणि जिल्हास्तरावर तिसऱ्या क्रमांकाचे तीन लाखांचे पारितोषिक पटकावले आहे. महाविद्यालयाने शासकीय शिष्यवृत्तीव्यतिरिक्त हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची तब्बल २१ लाख २० हजार ४०० रुपयांची शिष्यवृत्ती ५५० विद्यार्थ्यांना मिळवून दिली आहे. – डॉ. विजय मेधणे, प्राचार्य

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -