Wednesday, June 10, 2026

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज! आयटीआय ते पिंपळगाव बहुला मार्गावरील युटिलिटी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज! आयटीआय ते पिंपळगाव बहुला मार्गावरील युटिलिटी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

नाशिक : २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) तयारीचा भाग म्हणून नाशिक- त्र्यंबकेश्वर जोडणाऱ्या आयटीआय सिग्नल ते पिंपळगाव बहुला मार्गावर युटिलिटी प्रकल्पाला वेग आला आहे. ४.७७ किलोमीटरच्या मार्गावर पाणीपुरवठा, सांडपाणी, गॅस लाईन, ऑप्टिकल फायबर आणि पावसाळी पाणी निचरा आदी सेवा तयार केल्या जात आहेत.

महापालिकेच्या माहितीनुसार, पाणीपुरवठा, सिव्हरेज आणि एमएनजीएल गॅस पाइपलाइनची कामे पूर्ण झाली आहेत. डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी ४.७७ किमी ओएफसी नेटवर्क टाकण्याचे काम सुरू असून, २.८६६ किमी स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचे कामही प्रगतिपथावर आहे. सिंहस्थात वाढणारी गर्दी, पार्किंग आणि शहराच्या दीर्घकालीन विकासाचा विचार करून विविध विभागांच्या समन्वयातून हा प्रकल्प राबवला जात आहे. आयटीआय सिग्नल ते महिंद्रा सर्कल दरम्यान रस्त्याची एक बाजू बंद राहील. दोन्ही दिशेची वाहतूक दुसऱ्या बाजूने आणि पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कामांची सद्यःस्थिती

अमृत योजनेअंतर्गत ८३० मीटर पाणीपुरवठा लाइन पूर्ण

पीपी-एचएएम अंतर्गत ९०० मीटर सिव्हरेज नेटवर्क पूर्ण

एमएनजीएल गॅस पाइपलाइनचे ४२ मीटर काम पूर्ण

ओएफसी आणि स्टॉर्म वॉटर ड्रेनेजची कामे सुरू

या कामांमध्ये केवळ सिंहस्थाची गरज नाही, तर नाशिकच्या दीर्घकालीन विकासाचाही विचार आहे. दर्जा, टिकाऊपणा आणि नागरिक केंद्रित नियोजनाला प्राधान्य दिले आहे.प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊन नागरी सुविधा अधिक सक्षम होतील.

- मनीषा खत्री, आयुक्त, मनपा

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >