सावधान ! जनगणनेच्या नावाखाली सुरू आहे फसवणूक

मुंबई : मुंबईत जनगणनेच्या नावाखाली फसवणूक सुरू असल्याचे उघड झाले आहे. दुपारच्या वेळी घरातील तरुण वर्ग जेव्हा शिक्षण किंवा नोकरी - व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर असतो त्याचवेळी काही बोगस सरकारी अधिकारी निवासी वस्त्यांमध्ये प्रवेश करत आहेत. बनावट सरकारी कागदपत्र दाखवून जनगणना सुरू आहे, असे सांगून माहिती घेण्यासाठी घरात प्रवेश मिळवतात. पिण्यासाठी पाणी मागतात. घरातील सदस्य बेसावध आहेत याचा अंदाज येताच शस्त्राचा धाक दाखवून लुटालूट करतात. काही ठिकाणी हाच प्रकार आरक्षणासाठी सॅम्पल सर्व्हे सुरू आहे अथवा आयुष्मान भारत वा अन्य एखाद्या सरकारी योजनेसाठी माहिती हवी आहे असे सांगून केला जात आहे. राज्यात जनगणना अथवा कोणत्याही सरकारी सॅम्पल सर्व्हेचे काम सध्या सुरू नाही. यामुळे कोणीही जनगणना अथवा सॅम्पल सर्व्हेसाठी माहिती मागत असल्यास जास्त बोलणे टाळा आणि दार बंद करुन घ्या; हा सुरक्षित राहण्याचा एक सोपा पण प्रभावी पर्याय आहे.

सरकारच्या कल्याणकारी योजनेसाठी फोटो, बोटांचे ठसे अशा स्वरुपात माहिती हवी असल्याचे कारण सांगून बनावट सरकारी अधिकारी घरात प्रवेश करतात. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, फोटो, बोटांचे ठसे ही माहिती घेऊन नंतर त्याचा सायबर घोटाळ्यांसाठी गैरवापर करतात असेही उघड झाले आहे. केंद्र किंवा राज्य सरकार कोणत्याही कल्याणकारी योजनेसाठी फोटो, बोटांचे ठसे अशा स्वरुपाची खासगी माहिती घरोघरी जाऊन घेत नाही. अधिकृत सरकारी केंद्रावर नागरिकांना येण्याचे आवाहन केले जाते. या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा तसेच आवश्यक ते खबरदारीचे उपाय करुन माहितीचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेतली जाते. यामुळे नागरिकांनी बनावट सरकारी ओळखपत्र आणि इतर कागदपत्र दाखवून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध रहावे; असे आवाहन स्थानिक पोलिसांनी केले आहे.
Comments
Add Comment

मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व

मुंबईत अर्धवट राहिलेल्या ४२५ रस्त्यांच्या कामांना सुरुवात, १५० कामे अद्याप थांबलेलीच

मुंंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या अर्धवट कामांना आता

मुुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर धारावी प्रकल्पाचे होणार कास्टींग यार्ड?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करून देण्याच्या

Rain Update : 'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'मोंथा' (Montha)

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक