मुंबई पुणे एक्स्प्रेस वेच्या मिसिंग लिंकचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार

मुंबई : मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक'चे काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. काम वेळेत पूर्ण करताना हा प्रकल्प दर्जेदार व्हावा याची खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर राज्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास 'मिसिंग लिंक' कार्यरत झाल्यावर प्रवास आणखी वेगवान, आरामदायी, सुरक्षित, सोयीचा होईल; असा विश्वास राज्यमंत्र्यांनी व्यक्त केला.



'मिसिंग लिंक' अंतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज आणि खोपोली एग्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) दरम्यानचा भाग येतो. यामुळे सध्याचे १९ किमीचे अंतर सहा किमीने कमी होऊन १३.३ किमी इतके होणार आहे. यातून प्रवासाच्या वेळेत २०-२५ मिनिटांची बचत, इंधन बचत, वायु प्रदूषणात घट, घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडी तसेच अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. बोरघाटातील वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.



पुणे शहरातील वर्दळीच्या ३२ रस्त्यांवरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून ३२ रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. या रस्त्यांवरील सर्व अडथळे आणि अनधिकृत बांधकामं हटवून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात १५ आणि दुसऱ्या टप्प्यात १७ रस्त्यांचे काम होणार आहे. सासवड रस्ता, कात्रज-मंतरवाडी बायपास, जुना विमानतळ रस्ता, आळंदी रस्ता, पुणे-मुंबई जुना रस्ता, शास्त्री रस्ता, नेहरू रस्ता, टिळक रस्ता, साधू वासवानी रस्ता, बंडगार्डन रस्ता, डॉ. आंबेडकर रस्ता, महात्मा गांधी रस्ता (एमजी रोड), प्रिन्स ऑफ वेल्स रस्ता, कोंढवा मुख्य रस्ता, जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, सेनापती बापट रस्ता यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. या रस्त्यांवरील सर्व अडथळे आणि अनधिकृत बांधकामं हटवून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले जातील.
Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम