रत्नागिरी : येथील कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात ८ ते १२ मार्च असे पाच दिवस कृषी प्रदर्शन होणार आहे. यामध्येच पशु-पक्षी प्रदर्शनदेखील भरविण्यात येणार आहे. आत्मा, कृषी, बँकर्स, जिल्हा परिषद कृषी-पशुसंवर्धन, जिल्हा नियोजन अशा सर्व विभागांनी एकत्रित येऊन समन्वयाने कृषी प्रदर्शन यशस्वी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कृषी प्रदर्शनाच्या पूर्वतयारीबाबत आज बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, आत्माचे प्रकल्प संचालक विजय बेतीवार, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सूचित वंजारे आदी उपस्थित होते.
Nitin Gadkari : ऊस तोडणी यंत्रासाठी राज्याने केंद्राला सुधारित प्रस्ताव सादर करावा – गडकरी
जिल्हाधिकारी म्हणाले, कृषी विद्यापीठ, बँकर्स, जिल्हा परिषद, कृषी विभाग, एनआरएलएम या सर्वांनी आपापले स्टॉल उभारून योजनांची माहिती द्यावी. शेतकरी, उत्पादक, महिला बचत गट यांच्यासाठी माहितीप्रदान परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करावेत. ८ मार्च या महिला दिनानिमित्त विशेष स्पर्धात्मक कार्यक्रम घ्यावेत. प्रदर्शनाच्या सुरुवातीला प्रवेशद्वारावर क्युआर कोडच्या माध्यमातून माहिती प्रदर्शित करावी.
श्री. सदाफुले आणि श्री. बेतीवार यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.