अखेर रोहित शर्मा चमकला, केले ४९ वे आंतरराष्ट्रीय शतक

कटक : बाराबती स्टेडियममध्ये झालेला इंग्लंड विरुद्धचा एकदिवसीय सामना भारताने चार गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने इंग्लंड विरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २ - ० अशी जिंकली. कटकच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माची बॅट तळपली. त्याने ९० चेंडूत सात षटकार आणि बारा चौकार मारत ११९ धावांची खेळी केली. रोहितच्या शतकामुळे भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला. या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार रोहित शर्माला देण्यात आला.



मागील अनेक दिवसांपासून क्रिकेटप्रेमी वाईट कामगिरीसाठी रोहित शर्मावर टीका करत होते. अखेर रोहितने टीकाकारांना बॅटद्वारे प्रत्युत्तर दिले. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये १२, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३२ आणि टी २० मध्ये ५ अशी ४९ आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याची कामगिरी केली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४३०२, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०९८७ आणि टी २० मध्ये ४२३१ अशा एकूण १९ हजार ५२० धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या आहेत.



कटकच्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडने ४९.५ षटकांत सर्वबाद ३०४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ४४.३ षटकांत ६ बाद ३०८ धावा करुन सामना जिंकला. भारताने इंग्लंड विरुद्धचा नागपूरमधील एकदिवसीय सामना चार गडी राखून आणि कटकमधील सामनाही चार गडी राखून जिंकला. लागोपाठ दोन विजय मिळवणारा भारतीय संघ आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमध्ये बुधवार १२ फेब्रुवारी रोजी विजयाची हॅटट्रिक करण्यास उत्सुक असेल तर इंग्लंड व्हाईट वॉश टाळण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.
Comments
Add Comment

Nagpur : नागपूरमध्ये ‘U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्राच्या बॉक्सिंग इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी सातवी, १७ वर्षांखालील (अंडर १७) ज्युनिअर

Ind vs ZIM : बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : भारतीय संघ यावर्षी जुलैमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार असून, यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२०

रिझवी, स्तब्सच्या शतकी भागिदारीच्या जोरावर दिल्लीने लखनऊला हरवले

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर

नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोज - मंत्री आशिष शेलार

मुंबई : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी

Mohammed Shami : "मी जेव्हा..."; निवृत्तीच्या चर्चांवर मोहम्मद शमीने सोडले मौन

मुंबई : टीम इंडियासोबत आयसीसी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा मोहम्मद शमी अचानक गायब झाला. चॅम्पियन्स

IPL 2026 : तेवतियाच्या बॅटवर पंचांचा आक्षेप! ऐन सामन्यातच बदलावी लागली बॅट

मुंबई : आयपीएल २०२६ मधील गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात केवळ पराभवच नाही, तर एक वादग्रस्त