वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७ सामन्यांत अभिषेकला १२.७१ च्या सरासरीने फक्त ८९ धावा करता आला. त्यात झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव अर्धशतकाचा समावेश आहे. भारतासाठी महत्त्वाच्या सामन्यातही त्याची बॅट थंड राहिली व त्यामुळे त्याला फायनलमध्ये खेळवायचे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारताला अंतिम सामन्यात रविवारी, ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडचा सामना करायचा आहे व या सामन्यात एखादी चूक यजमानांना महागात पडू शकते.


भारतीय संघाने संजू सॅमसनला मोक्याच्या सामन्यात संधी दिली आणि त्याने त्याचे सोनं केलं. सुपर ८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या करो वा मरो सामन्यात संजूच्या नाबाद ९७ धावांनी संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले. तेच कालच्या वानखेडेवर झालेल्या उपांत्य सामन्यात संजूने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. त्याच्या सोबतीला इशान किशन उभा राहिला. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन फायनलसाठी इशान व संजू या जोडीचा विचार केल्यास, चुकीचं वाटायला नको. असं केल्यास रिंकू सिंगसाठी संघात जागा तयार केली जाऊ शकते. एक फिनिशर म्हणून तो उत्तम आहेच. फायनलमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये येण्यासाठी कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव हेही शर्यतीत आहेत. वॉशिंग्टन सुंदरला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही व त्याच्या जागी व्यवस्थापन सुंदर किंवा कुलदीपचा विचार करू शकेल. सुंदरच्या येण्याने संघाची फलंदाजीची फळी आणखी मजबूत होईल. कुलदीपचा अनुभव फायनलसाठी संघाला कामी येणारा ठरू शकतो. कुलदीपने ५४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत ९५ विकेट्स घेतल्या आहेत.


चांगली सुरुवात दिल्याचे समाधान


संजूकडे लागोपाठ २ शतकं झळकावण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली. शतक हुकण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना संजू सॅमसन म्हणाला, हे २ शतकं हुकले नाहीत. एका सामन्यात ९७ आणि एका सामन्यात ८९ धावा केल्या आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. मी माझ्या संघाला चांगली सुरुवात करून देत आहे, याचे मला समाधान आहे. आजकाल सामन्याचं खरं चित्र पॉवरप्लेमध्येच ठरतं. त्यामुळे ३-४ चेंडू खेळून काढल्यानंतर आक्रमण करावं लागतं. हेच अभिषेक, मी आणि इशान किशन करत आहे.


भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (क), हार्दिक पांड्या, टिळक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

Comments
Add Comment

भारतीय 'अ' संघाने श्रीलंकेला ६६ धावांनी पराभूत करत तिरंगी मालिका जिंकली

दंबुल्ला (श्रीलंका) : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक ९४ धावांच्या खेळीमुळे इंडिया 'अ' संघाने अंतिम सामन्यात

Indian Womens Hockey Team : भारतीय महिला हॉकी संघाला नेशन्स कपचे विजेतेपद

ऑकलंड : भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच हॉकी नेशन्स कप २०२६ जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारताने यजमान न्यूझीलंडचा

Varun Chakravarthy : आयर्लंड विरूद्धच्या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का ! स्टार गोलंदाज संघातून बाहेर

Mumbai : भारतीय संघाने घरच्या मैदानावर शानदार खेळ करत अफगाणिस्तान विरुद्धचा एकमेव कसोटी सामना तसेच तीन एकदिवसीय

FIFA World Cup 2026 : ऐतिहासिक घटना, एलॉय रूमने ९० मिनिटांत केले १५ सेव्ह ! इक्वेडोरला धक्का !!

मिसूरी : फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये छोट्याशा कॅरिबियन देश कुरासाओने इतिहास रचला आहे. इक्वेडोरसारख्या बलाढ्य

FIFA World Cup 2026 : सुपरफास्ट वर्ल्डकप, फक्त ३३ सामन्यांत घडली अनोखी घटना

Mumbai : फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये फक्त ३३ सामन्यांत १०० गोलची नोंद झाली आहे. याआधी १९८२ आणि २०१४ मध्ये ३६ सामन्यांत तर

Team India Squad Announcement : इंग्लंड दौऱ्यत विराट कोहलीचे पुनरागमन ? बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा !

Mumbai : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जुलैमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली