टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याचा निकाल कोणाच्याही बाजूने लागला, तरी क्रिकेटच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची नोंद होणार हे निश्चित आहे. एकीकडे भारतीय संघ तिसऱ्या जेतेपदासाठी मैदानात उतरेल, तर दुसरीकडे न्यूझीलंड आपला पहिला विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज असेल. भारताला २०१४ मध्ये श्रीलंकेने, तर न्यूझीलंडला २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाने विजेतेपदापासून रोखले होते. आता २०२६ च्या या ऐतिहासिक महामुकाबल्यात कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.


भारतीय संघाने आतापर्यंत दोन वेळा (२००७ आणि २०२४) टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. जर भारताने हा अंतिम सामना जिंकला, तर तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत जगातील पहिला संघ ठरेल. सध्या भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या तिन्ही संघांने प्रत्येकी दोन वेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे.


न्यूझीलंडच्या संघाने आजवर अनेकदा आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे; परंतु त्यांना एकदाही टी-२० विश्वचषक उंचावता आलेला नाही. २०२१ च्या विश्वचषकात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे, यंदाचा सामना जिंकल्यास न्यूझीलंड पहिल्यांदाच विश्वविजेता बनून नवा इतिहास घडवेल.


Comments
Add Comment

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील