Friday, March 28, 2025
Homeक्रीडाअखेर रोहित शर्मा चमकला, केले ४९ वे आंतरराष्ट्रीय शतक

अखेर रोहित शर्मा चमकला, केले ४९ वे आंतरराष्ट्रीय शतक

कटक : बाराबती स्टेडियममध्ये झालेला इंग्लंड विरुद्धचा एकदिवसीय सामना भारताने चार गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने इंग्लंड विरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २ – ० अशी जिंकली. कटकच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माची बॅट तळपली. त्याने ९० चेंडूत सात षटकार आणि बारा चौकार मारत ११९ धावांची खेळी केली. रोहितच्या शतकामुळे भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला. या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार रोहित शर्माला देण्यात आला.

India vs England: दुसऱ्या वनडेत भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिकेत २-० ने विजयी आघाडी

मागील अनेक दिवसांपासून क्रिकेटप्रेमी वाईट कामगिरीसाठी रोहित शर्मावर टीका करत होते. अखेर रोहितने टीकाकारांना बॅटद्वारे प्रत्युत्तर दिले. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये १२, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३२ आणि टी २० मध्ये ५ अशी ४९ आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याची कामगिरी केली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४३०२, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०९८७ आणि टी २० मध्ये ४२३१ अशा एकूण १९ हजार ५२० धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या आहेत.

India vs England: पहिल्या वनडेत भारताचा इंग्लंडवर सहज विजय

कटकच्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडने ४९.५ षटकांत सर्वबाद ३०४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ४४.३ षटकांत ६ बाद ३०८ धावा करुन सामना जिंकला. भारताने इंग्लंड विरुद्धचा नागपूरमधील एकदिवसीय सामना चार गडी राखून आणि कटकमधील सामनाही चार गडी राखून जिंकला. लागोपाठ दोन विजय मिळवणारा भारतीय संघ आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमध्ये बुधवार १२ फेब्रुवारी रोजी विजयाची हॅटट्रिक करण्यास उत्सुक असेल तर इंग्लंड व्हाईट वॉश टाळण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -