Tuesday, March 18, 2025
Homeसाप्ताहिककोलाजColor Of Love : ‘प्रेमा’ तुझा रंग कसा?

Color Of Love : ‘प्रेमा’ तुझा रंग कसा?

वैष्णवी भोगले

प्रेम हा शब्द जगायला शिकवतो. म्हणून तर प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्या दिवसाची वाट पाहावी लागत नाही. कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी चेहऱ्यावरचे हसूदेखील पुरेसे असते. नजरेचा एक कटाक्ष प्रेमाची कबुली देण्यासाठी पुरेसा असतो; पण काळाने रूपडे पालटले आहे. त्याप्रमाणे प्रेम व्यक्त करण्याच्या कल्पनादेखील बदलल्या आहेत. आजकाल तुझा व्हॅलेंटाईन कोण रे असे जरी सहज विचारले तरी अनेकांचा चेहरा गुलाबी होतो. प्रत्येक माणूस प्रेम करतो. प्रेम करणाऱ्याला वयाचं बंधन नसतं. त्यामुळे प्रत्येकाची प्रेम करण्याची वेगळी पद्धत आणि प्रेमाचा रंगही वेगळा असतो.

‘मैं तुम्हारे लिये जान भी दे सकता हू और ले भी सकता हु… हे आजच्या तरुण, सळसळत्या तांबड्या पिढीचं जणू ब्रीद वाक्यच झालं आहे. प्रेम हे आंधळं असतं असे म्हणतात. पण जेव्हा दोघांचेही एकमेकांबद्दल निर्णय चुकतात तेव्हा पश्चातापाची वेळ येते. नवनवीन येऊ घातलेल्या ट्रेडमुळे प्रेमाची जणू परिभाषाच बदलली आहे. प्रेमाच्या डोहात बुडालेली अल्पवयीन मुलं जेव्हा आडोशाला जाऊन आणाभाका सांगून प्रेमाच्या नावाखाली चुकीचे उद्योग, शारीरिक अपेक्षा, लग्नाची वचने, दोघांच्या मनाविरुद्ध काही घडले, तर एकमेकांना सोडून देणे, नवीन नाती जुळवणे हे आजच्या पिढीकडून सर्रास घडत आहे. प्रेमाला वयाचं बंधन नसले तरी भविष्यात प्रेम खूप काही शिकवून जातं.

प्रेमाच्या आणाभाका सांगून समोरच्या व्यक्तीकडून मिळणारे आर्थिक लाभ, प्रलोभने, भौतिक सुख याला बळी पडू नका. अल्पवयीन मुलांनी हलगर्जीपणाने आयुष्याचा निर्णय घेऊ नका. प्रेम व्यक्त करण्याचा एकच दिवस नसून प्रेम ही एक जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे ज्यात दोन जीवांना आयुष्यभर साथ देऊन एकत्र चालायचे आहे. संस्कृतीचा हा प्रेमाचा दिवस आपण कोणत्याही मर्यादा न ओलांडता साजरा केला, तर दोघांसोबत आयुष्यातील अनेक आठवणी असतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -