मुलुंडमध्ये दोन दिवसांचा मुंबई उपनगर ग्रंथोत्सव

मुंबई : मुलुंडमध्ये दोन दिवसांचा मुंबई उपनगर ग्रंथोत्सव होणार आहे. हा सोहळा बुधवार १२ आणि गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, ग्रंथालय इमारत मुलुंड पश्चिम येथे उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील असतील तर प्रमुख उपस्थिती कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सह-पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची असेल.



उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर, समन्वय समिती व जिल्ह्यातील सर्व शासन मान्य ग्रंथालय यांनी संयुक्तपणे १२ आणि १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ग्रंथदिडी, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथ विक्री तसेच चर्चासत्र आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ग्रंथदिंडीचा कार्यक्रम बुधवार १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत आहे.ग्रंथदिंडीचे उद्धघाटन आमदार मिहिर कोटेचा यांच्या हस्ते होणार आहे.



चर्चासत्र आणि मार्गदर्शन

बुधवार १२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सत्रात 'मराठीतील पहिले ज्ञानपीठ' या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक चंद्रकांत भोंजाळ, प्रसिद्ध साहित्यिक चांगदेव काळे, प्रसिद्ध समीक्षक आणि लेखक डॉ. अनंत देशमुख यांचे दुपारी १२.३० ते १.१५ या विषयावर मार्गदर्शन. तर दुपारी २ ते २.३० यावेळेत कुमारी सई विकास खंडाळे यांचे 'छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र' या विषयावर व्याख्यान, नंतर दुपारी २.३० ते ३.१५ या वेळेत 'राज्य सेवा आयोग व लोक सेवा आयोग स्पर्धा परीक्षांविषयक मार्गदर्शन' या विषयावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव अभिजीत लेंडवे, उषा प्रविण गांधी कला व विज्ञान महाविद्यालयाचे श्रीराम देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी ३.३० ते ४.३० 'अभिजात मराठीतील शब्द वैभव' या विषयावर दूरदर्शनच्या निवेदिका दिपाली केळकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.



गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी 'कथा कवितेच्या राज्यात' या विषयावर सकाळी १० ते ११.१५ वाजेपर्यंत बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांचे सादरीकरण. 'भारतीय संविधान माझा अभिमान' या विषयावर संविधानाचे लेखक आणि अभ्यासक सुरेश सावंत यांचे सकाळी ११.३० ते १२.१५ या वेळेत व्याख्यान. तर दुपारी १२.३० ते १.१५ येथे 'लोककला समजून घेताना' या विषयावर श्रीमती डॉ. मोनिका ठक्कर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी २ ते २.४५ या वेळेत 'आधुनिक शेती' या विषयावर कृषीतज्ज्ञ दिलीप फुके, मालाड येथील श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालयाचे प्रवीण मालोडकर यांचे 'कोवळ्या पालेभाज्या' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.४५ ते ४.१५ या वेळेत 'संत साहित्य गाण्यामधून' या कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ चांभई यांचा कार्यक्रम होणार आहे. तर कार्यक्रमाचा समारोप लेखक रमेश नागपुरे यांच्या उपस्थितीत दुपारी ४.१५ ते ५ या वेळेत होईल.
Comments
Add Comment

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा हिकारू नाकामुरावर पलटवार

मुंबई  : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी.

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी - तटकरे

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ