BMC Project : सांताक्रुझमध्ये मुंबई महानगरपालिकेचा पुष्पोत्सव

मुंबई : मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांनी पश्चिम उपनगरात फळे फुले भाज्यांच्या प्रदर्शन सांताक्रुज पश्चिम येथील जुहू लायन्स म्युनिसिपल पार्क अर्थात एरोप्लेन गार्डन या ठिकाणी आयोजित केले आहे.फळे ,फुले, भाज्या, आयुर्वेदिक वनस्पती, हंगामी फुलझाडे या सर्वांनी युक्त हे प्रदर्शन नागरिकांसाठी रविवार सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत व सोमवारी सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत नागरिकांकरिता विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उपनगरचे पालकमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री ऍड आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडले.



मुंबई महापालिका वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने मागील आठवड्यात उद्यान विषयक प्रदर्शन अर्थात पुष्पोत्सव २०२५ पार पडला. त्यानंतर उपनगरात सांताक्रुज पश्चिम येथील जुहू लायन्स म्युनिसिपल पार्क अर्थात एरोप्लेन गार्डन या ठिकाणी फळे, फुले भाज्यांच्या प्रदर्शन भरवण्यात आले आहे.



या प्रदर्शनात गुलाब, झेंडू ,झिनीया, शेवंती , विविध प्रकारच्या ऑर्किड यांचे मिळून सुंदर देखावे या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत .यात विविध रंगांच्या फुलांच्या सजावटी सोबत प्रत्येक रंगाचा आपल्या आयुष्यात असलेला अर्थ स्पष्ट केला आहे. 'चला जगूया रंग आयुष्याचे " या संकल्पनेवर आधारित विविध फुलांच्या मदतीने इंद्रधनुष्य तयार करण्यात आलेला आहे. आणि त्याच्या विविध रंग, आपल्या जीवनात असलेले महत्त्व असा प्रदर्शनाचा आशय आहे.



लाल रंग प्रेम दर्शवतो ,हिरवा रंग सृष्टी आणि त्याची वाढ दर्शवतो, पिवळ्या रंग आनंद ,नारंगी रंग नवनिर्मिती असे विविध रंग त्याचे अर्थ आणि त्या रंगांच्या फुलांनी त्या निर्माण केलेल्या कलाकृती या ठिकाणी नागरिकांच्या प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहेत.आनंद ,आशा ,अपेक्षा ज्ञान ,योग ,अध्यात्मिकता, प्रेम विश्वास अशा विविध मानवी भावना दर्शवणारे रंग आणि त्यांची फुलं यांचा मिळून आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत. फळे ,फुले, भाज्या, आयुर्वेदिक वनस्पती, हंगामी फुलझाडे या सर्वांनी युक्त हे प्रदर्शन नागरिकांसाठी रविवार सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत व सोमवारी सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत नागरिकांकरिता विनामूल्य खुले राहणार आहे. उद्यान विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी आणि त्यांच्या उद्यान विभागातील अधिकारी कर्मचारी हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या