
मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातून अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली आहे. राजगडमध्ये एका ११ वर्षांच्या मूकबधीर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे. अज्ञात आरोपीने मुलीला झोपेतून उचलून जंगलात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचा गंभीर गुन्हा केला. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता अल्पवयीन मुलगी जंगलात दयनीय अवस्थेत सापडली. उपचार सुरू असताना मुलीचा मृत्यू झाला.

मेक्सिको : दक्षिण मेक्सिकोमध्ये रस्ते ट्रकची बसला जोरात धडक लागून भीषण अपघात घडला. या धडकेत बसला आग लागली. या आगीत तब्बल ४१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू ...
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील राजगडमध्ये ११ वर्षांच्या मुलीला झोपेतून उचलून नेण्यात आले. पीडित मुलगी तिच्या आजी आणि काकासोबत नरसिंहगड शहरातील सरकारी विश्रामगृहाच्या मागे असलेल्या झोपडीत झोपली होती. या मुलीला बोलता आणि ऐकता येत नव्हतं. बेपत्ता मुलीचा शोध घेतला असता पोलिसांना ती जंगलात रक्तबंबाळ अवस्थेत सापडली. उपचारासाठी तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता धक्कादायक माहिती समोर आली.

मुंबई : अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला 'छावा' सिनेमा येत्या १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'छावा' (Chhaava) सिनेमा पाहण्यासाठी ...
पीडित मुलीवर नराधमाने बलात्कार करून मारहाण केली आणि पीडितेच्या खाजगी भागात गंभीर जखमा देखील करण्यात आल्या. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे पीडितेची प्रकृती खूपच गंभीर झाली होती. परंतु, उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. दरम्यान आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्याचा अधिकचा तपास घेत आहेत.