मेक्सिको : दक्षिण मेक्सिकोमध्ये रस्ते ट्रकची बसला जोरात धडक लागून भीषण अपघात घडला. या धडकेत बसला आग लागली. या आगीत तब्बल ४१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.ही दुर्घटना शनिवारी मेक्सिकोमधील दक्षिणेकडील राज्य असलेल्या तबास्को येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार ४८ प्रवाशांना घेऊन जाणारी बस एका ट्रकला धडकली. बस कॅनकुनहून तबास्कोला येत होती. या अपघातात बसमधील ३८ प्रवासी आणि दोन चालकांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. ट्रक चालकाचाही यामध्ये मृत्यू झाला. या अपघाताची काही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यात स्पष्ट दिसून येतंय कि टक्कर झाल्यानंतर बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि पूर्णपणे जळून खाक झाली.
Maharashtrian Comedian : माजी मुख्यमंत्री शिंदेंच्या नातवावर जोक करणाऱ्या विनोदवीराला मारहाण
आग विझवल्यानंतर, फक्त बसच्या चौकटीचे अवशेष शिल्लक राहिले. आतापर्यंत ३८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.तसेच या अपघातग्रस्त बसमधून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांपैकी १८ जणांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. मात्र मृतदेह ओळखण्यापलिकडे गेले आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त बसच्या संचालक कंपनीने अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. हा अपघात कसा झाला आणि अपघात झाला तेव्हा बस वेगमर्यादेमध्ये होती का? याचा तपास अधिकाऱ्यांसोबत मिळून करण्यात येत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.