Wednesday, April 29, 2026

महाविकास आघाडीत बिघाडी? विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार, अंबादास दानवे यांची उमेदवारी प्रदेश काँग्रेसला अमान्य

महाविकास आघाडीत बिघाडी? विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार, अंबादास दानवे यांची उमेदवारी प्रदेश काँग्रेसला अमान्य

राज्याचं लक्ष लागलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा होण्यास सुरुवात झाली असून भाजपनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आला. माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचं नाव विधानपरिषदेचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं असलं तर यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून आलंय.

अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिली त्यानंतर आता महाविकास आघाडीत मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अंबादास दानवे यांची उमेदवारी प्रदेश काँग्रेसला अमान्य असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे.

अंबादास दानवे यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघडीत घमासान पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने जाहीर केले होते की उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास आमचा पाठिंबा असेल, मात्र जर दुसरा कोणी उमेदवार असेल तर आम्ही उमेदवार देणार. त्यानुसार अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करून उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे.

Comments
Add Comment