Wednesday, April 29, 2026

गॅस सिलेंडर मोफत हवा आहे ? मग मोदी सरकारची 'ही' भन्नाट योजना तुम्हांला माहित असायलाच हवी

गॅस सिलेंडर मोफत हवा आहे ? मग मोदी सरकारची 'ही' भन्नाट योजना तुम्हांला माहित असायलाच हवी

ग्रामीण भागात अजूनही अनेक महिला पारंपरिक इंधनावर स्वयंपाक करतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे महिलांना धुरापासून मुक्ती मिळून सुरक्षित आणि स्वच्छ इंधनाचा वापर करता येतो. आतापर्यंत देशभरात १० कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. (Pradhan Mantri Ujjwala Yojana)

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील महिलांना मोफत गॅस कनेक्शन, सिलेंडर आणि गॅस शेगडी दिली जाते. २०१६ पासून सुरू झालेल्या या योजनेमुळे लाखो महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना स्वयंपाकासाठी सुरक्षित आणि परवडणारे इंधन उपलब्ध करून देणे. यामुळे महिलांचे आरोग्य सुधारते तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनात सुलभता येते.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये अर्जदार महिला किमान १८ वर्षांची असावी, संबंधित महिलेकडे यापूर्वी गॅस कनेक्शन नसावे, लाभार्थी बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) कुटुंबातील असावा, महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील असावी,भारत गॅस,इंडियन गॅस किंवा एचपी गॅस यापैकी कोणत्याही कंपनीची निवड करता येते. (Pradhan Mantri Ujjwala Yojana)

या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असते. जसे की, जात प्रमाणपत्र बीपीएल रेशनकार्ड मोबाईल नंबर पत्त्याचा पुरावा (उत्पन्न दाखल्यासह) पासपोर्ट आकाराचा फोटो

अर्ज कसा कराल? प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी www.pmuy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे. या संकेतस्थळावर योजनेची सविस्तर माहिती उपलब्ध असून, ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रक्रिया पूर्ण करता येते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >