पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी आल्यास लाखो मूर्तिकार होणार बेरोजगार

मुंबई : १३० वर्षाची परंपरा असणाऱ्या गणेश उत्सवातील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी आणण्यासाठी काही पर्यावरण प्रेमी संस्था आक्रमक झाल्याने, हरित लवाद, महानगर पालिका, प्रदूषण मंडळ व इतर संबंधित प्राधिकरणाने आक्रमक भूमिका घेत राज्यातील पी ओ पी च्या मूर्ती विसर्जित करण्यावर बंदी आणली आहे. त्यामुळे गणेश मूर्तिकार व त्यावर अवलंबून असणारे लाखो कारागीर व त्यांचे कुटुंब हवालदिल झाले आहे.


सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करत आहाला न्याय द्यावा. अशी मागणी मूर्तिकार संघटनेने केली आहे. मुंबई प्रेस क्लब येथे या संदर्भात माहिती देताना संघटनेचे पदाधिकारी हितेश जाधव म्हणाले की, पी ओ पी गणेश मूर्ती मुळे पर्यावरणाची हानी होते असे पर्यावरण प्रेमी यांचे म्हणणे , तर शाडूची माती आम्ही आणायची कुठून असा सवाल त्यांनी केला.


या विषयावर पर्यावरण संस्था न्यायालयात गेल्या आहेत. मात्र त्यांनी याला पर्याय दिला नाही. असा सवाल करत सिद्धेश दिघोळे म्हणाले, सरकारने याबाबत मूर्तिकार व त्यांच्या कुटुंबियांच्या रोजगाराचा विचार करावा. आम्ही जगायचे कसे? असा सवाल केला. शाडू मातीची मूर्ती की पी ओ पी मूर्ती याबाबत मूर्तिकार संघटना व मूर्तिकार गोंधळात पडले आहेत. माघी गणेश उत्सव मधील चार ठिकाणच्या मूर्ती विसर्जन करू दिल्या नाहीत म्हणून त्या पुन्हा मंडपात ठेवल्या आहेत. त्यामुळे पालिकेने याबाबत सकारात्मक विचार करावा अशी मागणी प्रशांत देसाई यांनी केली आहे. तर संतोष कांबळी हे लालबाग राजा चे मूर्तिकार म्हणाले, आम्हाला नागपूर अधिवेशनात सरकारकडून आश्वासन दिले गेले की, पी ओ पी मूर्ती कारवाई बाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल. मग पालिकेने कारवाई कशी सुरू केली. आता जर सरकारने आमचा विचार केला नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला.

Comments
Add Comment

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास