दिल्लीचा कल, फुलले भाजपाचे कमळ

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी बुधवार ५ फेब्रुवारी २०२५ रोजी एका टप्प्यात मतदान झाले. मतमोजणी आज (शनिवार ८ फेब्रुवारी २०२५) होत आहे. आतापर्यंत हाती आलेले कल बघता, भारतीय जनता पार्टी ४० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. यामुळे 'दिल्लीचा कल, फुलले भाजपाचे कमळ' असे म्हणण्याजोगी परिस्थिती आहे. आम आदमी पक्षाचे अनेक उमेदवार पिछाडीवर आहेत. पिछाडीवर असलेल्यांमध्ये 'आप'चे प्रमुख नेते पण आहेत.



दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल (निवडणूक आयोगाचे निकालाचे पान)

दिल्लीत भाजपाची सत्ता आली तर दिल्लीकरांना डबल इंजिन सरकारचा फायदा होईल. दिल्लीतील वाहतूक समस्या, प्रदूषण, शिक्षण, रोजगार आदी समस्या सुटण्यास मदत होईल, असा विश्वास भाजपाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तर अजून निकाल जाहीर झालेला नाही. थोडा वेळ थांबा, अशी प्रतिक्रिया 'आप'चे कार्यकर्ते देत आहेत.



याआधी दिल्लीत मतदानाच्यावेळी गडबड झाल्याची दावा आम आदमी पक्षाने आणि काँग्रेसने केला. पण दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाला अद्याप ठोस पुरावे सादर केलेले नाही. निवडणूक आयोगाने विरोधकांच्या तक्रारींची दखल घेतल्याचे जाहीर केले आणि योग्य शब्दात स्पष्टीकरण लवकरच देणार असल्याचे जाहीर केले. मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक कशी योग्य प्रकारे झाली, हे स्पष्ट करणारी आकडेवारी देऊ, असे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत. पण आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा आरडाओरडा म्हणून पराभवाची कारणे सांगण्याची पूर्वतयारी असल्याची प्रतिक्रिया भाजपाने दिली आहे.
Comments
Add Comment

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही

१ कोटींचा इनामी माओवादी हिडमा अखेर ठार; सीमेवर भीषण चकमक

छत्तीसगढ : कुख्यात माओवादी कमांडर मडवी हिडमा अखेर सुरक्षा दलांच्या जाळ्यात सापडला. आंध्र प्रदेशातील अल्लुरी

'दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू'

नवी दिल्ली: दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू आणि कठोर शिक्षा करू, असे केंद्रीय

लिव्ह-इन रिलेशनशिप कधीही स्वीकारणार नाही

सोरममधील सर्वखाप पंचायतीने व्यक्त केली नाराजी  उत्तर प्रदेश  : सोरममधील सर्वखाप पंचायतीने लिव्ह-इन रिलेशनशिप

उत्तर प्रदेशातील रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना ५० हजारांचे इंजेक्शन मिळणार मोफत!

सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय उत्तर प्रदेश  : उत्तर प्रदेश सरकारने हृदयविकाराच्या रुग्णांसाठी