लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा तब्बल ८ वर्षांनी होणार आहे. यासाठी आयसीसी सज्ज झाली आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे असून ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येणार आहे. त्यानुसार भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. अशातच आता आयसीसीने स्पर्धेचे अधिकृत गाणे लाँच केले आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे अधिकृत गाणे लाँच केले आहे. या गाण्याचं नाव जितो बाजी खेल के असं आहे. हे गाणे प्रसिद्ध पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम याने गायले आहे. तसेच या गाण्याचे निर्माते अब्दुल्ला सिद्दिकी असून अदनान धुल आणि अस्फंदयार असद यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानची झलक दिसत आहे, ज्यात रस्ते, बाजार, स्टेडियम यातून क्रिकेटबद्दलचे प्रेम दाखवण्यात आले आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये अतिफ अस्लमचा परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे.
The wait is over! 🎉
Sing along to the official song of the #ChampionsTrophy, Jeeto Baazi Khel Ke, featuring the master of melody @itsaadee 🎶🏆 pic.twitter.com/KzwwylN8ki
— ICC (@ICC) February 7, 2025
Railway Megablock : प्रवाशांचे होणार हाल! पश्चिम रेल्वेवर १३ तासांचा जम्बो ब्लॉक
यापूर्वी २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली होती, त्यानंतर ही स्पर्धा गेली आठ वर्षे झाली नव्हती.ही स्पर्धा दोन आठवडे चालणार असून २०२३ वनडे वर्ल्ड कपमध्ये पहिल्या ८ संघात स्थान मिळवलेल्या संघात खेळली जाणार आहे. १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान १५ सामने या स्पर्धेत खेळले जाणार आहेत.या स्पर्धेतील साखळी फेरीसाठी ८ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारतासह बांगलादेश, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे ४ संघ आहेत. तसेच ब गटात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे ४ संघ आहेत.