Thursday, June 4, 2026

IND vs AFG :टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली वनडे मालिकेतून बाहेर; रोहित शर्माच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह

IND vs AFG :टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली वनडे मालिकेतून बाहेर; रोहित शर्माच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह

मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आगामी वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. स्टार फलंदाज विराट कोहली हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर पडल्याचे सागण्यात आले आहे. यामुळे भारतीय संघाच्या फलंदाजीची ताकद कमी झाली आहे. चाहत्यांमध्येही निराशा पसरली आहे.मिडीयाच्या अवहालानुसार , विराटच्या पायाच्या स्नायूमध्ये ताण आल्याने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आयपीएल फायनलनंतर वाढली दुखापत

37 वर्षीय विराट कोहलीने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल हंगामात शानदार कामगिरी करत आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अंतिम सामन्यात त्याने नाबाद 75 धावांची खेळी करत संघाला विजया मिळवून दिला. मात्र, स्पर्धेनंतर त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवू लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो आफगानिस्तान विरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला आहे.

रोहित शर्माबाबतही सस्पेन्स कायम

विराट कोहलीनंतर आता सर्वांचे लक्ष रोहित शर्मा कडे लागले आहे. रोहितलाही हॅमस्ट्रिंगची दुखापत असल्याने त्याचा अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील सहभाग अद्याप निश्चित झालेला नाही. आयपीएल दरम्यान रोहित दुखापतीमुळे काही सामने खेळु शकला नव्हता. सध्या त्याच्या फिटनेसवर वैद्यकीय पथक बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अंतिम निर्णय फिटनेस चाचणीनंतरच घेतला जाणार आहे.

14 जूनपासून वनडे मालिकेला सुरुवात

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दौऱ्याची सुरुवात 6 जूनपासून होणाऱ्या आहे. एकमेव कसोटी सामन्याने होणार आहे. त्यानंतर 14 जूनपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होईल. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सध्या फक्त वनडे क्रिकेट खेळत आहेत. दोघांनीही टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या मालिकेत हे दोघेही अनुपस्थित राहिल्यास स्पर्धेच्या लोकप्रियतेवर आणि टीव्ही व्ह्यूअरशिपवर मोठा परिणाम होऊ शकतो. चाहत्यांमध्येही चर्चेंना उधाण आले आहे.

युवा खेळाडूंना मोठी संधी

जर रोहित शर्मा देखील मालिकेतून बाहेर राहिला, तर युवा खेळाडूंना आपला खेळ सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळेल. तसेच भारतीय संघ व्यवस्थापनाला 2027 वनडे विश्वचषकाच्या तयारीसाठी नवीन पर्याय आजमावण्याची संधीही मिळू शकते. विराटच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला असला, तरी आता रोहित शर्मा फिट होतो का?. त्याच्या जागी कोणाला संधी मिळते, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >