
पुणे : पुण्यात सातत्याने गाड्यांची तोडफोडीच्या घटना ऐकायला मिळत आहेत. त्याचबरोबर कोयते घेऊन दहशत पसरवणारी गँग देखील थांबायचे नाव घेत नाही. यावर आता शेवटचा उपाय म्हणून पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पोलीस आयुक्तांना महत्वाचे आदेश दिले आहेत. या तोडफोड गँगला जामीनच मिळणार नाही, असे मोक्काचे कलम लावा, असे स्पष्टपणे सांगितले आहे. पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
वारंवार तोडफोडीच्या घटना घडत असताना त्यावर कुठलेही नियंत्रण येत नसल्याने अजित पवारांनी थेट पोलीस आयुक्तांवरच प्रश्नांची सरबत्ती केली.

मुंबई : घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवले आहे. करूणा शर्मा ...
बिबवेवाडी परिसरात मध्यरात्री काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी केलेल्या गाड्यांच्या तोडफोडप्रकरणाची पवारांनी दखल घेतली. कोयता गँग, तोडफोड करणाऱ्यांचा बंदोबस्त करा. त्यांच्यावर मोक्का लावा. आरोपींना पकडल्यानंतर त्यांची अशी धिंड काढा की शहराला कळाले पाहिजे की चुकल्यानंतर कायदा कसा असतो. या कार्यक्रमात पुण्याचे पोलीस आयुक्त हवे होते, त्यांना पण सुनावले असते, अशा शब्दांत पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोरच पुणे पोलीस आयुक्तांना इशारा दिला.