मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करताय...तर हे वाचा...

खेड (प्रतिनिधी) : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गांपैकी एका भुयारी मार्गातून वाहतूक सुरू असली तरी येथील दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी अद्याप प्रतिक्षाच करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. प्रजासत्ताक दिनी तरी हे काम पूर्णत्वाला जाईल, अशी अपेक्षा होती. त्यासाठी या कामाला गती देण्यात आली होती. मात्र, अद्याप हे काम अपूर्ण असल्याने बोगद्याची प्रतीक्षा कायम राहिली आहे.


पोलादपूर बाजूला कातळी भोगावच्या पुलावरील गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्ण आहे, म्हणजेच पिलर्स आणि गर्डर्स एकसंघ मिळून येण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी आवश्यक असल्याने या भुयारी मार्गातून वाहतूक सुरू होण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त टळला आहे. पहिल्या भुयारी मार्गातील काम पूर्णत्वास गेले असल्याने या मार्गातून दुहेरी वाहतूक सुरू झाली.


४५ मिनिटांचा कशेडी घाटातून वाहतुकीसाठी लागणारा वेळ आता अवघ्या ८-१० मिनिटांवर आला असल्याने तसेच कशेडी घाटातील अपघाताचे प्रमाणही घटले असल्याने वाहनचालकांकडून भुयारी मार्गातील वाहतुकीस प्रथम पसंती दिली जात आहे. मध्यंतरी कातळी भोगावपर्यंतच्या रस्त्यावरील पुलांवर गर्डर बसविण्याच्या कामानिमित्त भुयारी मार्गातून वाहतूक बंद करण्यात येऊन कशेडी घाटातील वाहतूक सुरू करण्यात आली होती. दुसऱ्या भुयारी मार्गातील आतील भागातील भुयाराच्या दुतर्फा संरक्षक कठडे बांधण्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. प्रकाश झोताचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून दोन्ही भुयारांना जोडणारे चार भुयारी मार्ग अपूर्णावस्थेत आहेत.

Comments
Add Comment

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!