मुंबई : इंडिगो एअरलाईन्सच्या दोन हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. कर्मचाऱ्यांच्या भाजपातील प्रवेशामुळे इंडिगो एअरलाईन्समधील उद्धव ठाकरे गटाच्या कर्मचारी संघटनेला धक्का बसला आहे.
भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांचे भाजपात स्वागत केले. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन समाजातील सर्व थरातील नागरिकांच्या कल्याणासाठी काम करत आहे. भाजपाच्या नेत्यांचे हे काम बघितल्यानंतरच इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला आहे, असे रविंद्र चव्हाण म्हणाले. ते मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांच्या पक्ष प्रवेशावेळी बोलत होते.
भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये युनिट अध्यक्ष करण कांबळे, युनिट सरचिटणीस दिनेश शेवाळे, युनिट उपाध्यक्ष सिराज हाश्मी, युनिट कोषाध्यक्ष चंदन कांडू, संयुक्त खजिनदार मोहम्मद शाहिद हुसेन, युनिट सेक्रेटरी रणजीत नरे, युनिट सेक्रेटरी राकेश कदम, युनिट सेक्रेटरी लक्ष्मण सुरवसे, युनिट सेक्रेटरी विजय यादव, युनिट समिती सदस्य अंकुश निकम, सुनील लोखंडे,अंकुश इंगळे, संदीप कांबळे, शैलेश पवार, सचिन काटकर, सचिन आग, सचिन कांबळे, श्रीनाथ पाडेकर, महबूब पाशा, हर्षद अहिरे, रोहित चतुर्वेदी, ओंकार नाईक, विक्रांत डोईफोडे, विनीत पाटील, संदीप सानप, पूजाताई तांडेल, सपनाताई गोडक्या आदी सदस्य आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला त्यावेळी विलेपार्ले विधानसभेचे आमदार पराग अळवणी, एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईजचे ऑल इंडिया अध्यक्ष नितीन जाधव, सरचिटणीस सुहास माटे, योगेश आवळे आदी उपस्थित होते.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…