मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin) योजनेअंतर्गत अर्जाची फेरतपासणी सुरू असून, निकष पूर्ण न करणाऱ्या तसेच बनावट कागदपत्रे लाभार्थ्यांवर कारवाई होत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या काही लाडक्या बहिणींवर पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे. याबाबत ४ ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले.
तसेच सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे, असे आदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रातील माता भगिनींच्या कल्याणासाठी महायुती सरकारने प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या १६ पुरुषांचे तसेच या गैरप्रकारात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आले आहे. यापुढेही महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, जानेवारी २०२५ पर्यंत या योजनेच्या सात हप्त्यांचे प्रत्येकी दिड हजार रुपये प्रमाणे १० हजार ५०० रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. मात्र, पात्रतेची तपासणी सुरू असल्याने कारवाईच्या भीतीने अनेक महिला योजनेचा लाभ नाकारत आता त्यासाठी अर्ज करताना दिसत आहेत.
जानेवारी महिन्याचा हफ्ता काही दिवसांपूर्वी सर्व महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. तर निकषात न बसणाऱ्या महिलांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये भीतीचे वातावरण आहे, काही महिला स्वतःहून मिळालेला लाभ नाकारत आहेत.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…