पंढरपूर : दरवर्षी वसंत पंचमीच्या (Vasant Panchami) मुहूर्तावर पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडतो. त्याप्रमाणे वसंत पंचमीमिनित्त आज विठ्ठल रुक्मिणी मातेचा सोहळा पार पडला आहे. आज सकाळी १० ते १२ वाजेच्या सुमारास लाखो भक्तांच्या हजेरीत हा सोहळा पार पडला. (Vitthal Rukmini Vivah Sohla)
Jioचा ९९९ रूपयांचा रिचार्ज, ३ महिन्यांपेक्षा अधिक चालणार, मिळणार हे फायदे
विवाह सोहळ्यासाठी बंगळूरहून विठ्ठल रुक्मिणीसाठी विशेष पोशाख शिवण्यात आला होता. विवाह सोहळ्यापूर्वी सकाळी काकड आरतीदरम्यान विठ्ठलाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्यात आले असून सोन्याच्या मुकुटाऐवजी पांढरे पागोटे घालण्यात आले होते. भजन कीर्तन करत महिलांनी फेर धरला असून फुगड्या घालत मंदिर परिसर जल्लोष आणि गजबजला होता.
मंदिरात फुलांची सजावट
विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळ्यानिमित्त संपूर्ण मंदिराला विविध प्रकारच्या रंगबिरंगी फुलांनी सजविण्यात आले आहे. गुलाब, रेड गुलाब, पांढरा गुलाब, पिंक गुलाब, पिवळा गुलाब, जिप्सी, डिजी, सुर्यफुल, जरबरा, तगर, गुलछडी, कामिनी, शेवंती, पासली, काडी, गिलाडो, तुक्स, गोंडा (लाल पिवळा) बिजली, अस्टर इत्यादी फुलांचा वापर करण्यात आला आहे. तसेच सुमारे साडेतीन ते चार टन फुल् आणि १ टन ऊसाचा वापर करण्यात आला आहे. (Vitthal Rukmini Vivah Sohla)