Wednesday, July 9, 2025

Jioचा ९९९ रूपयांचा रिचार्ज, ३ महिन्यांपेक्षा अधिक चालणार, मिळणार हे फायदे

Jioचा ९९९ रूपयांचा रिचार्ज, ३ महिन्यांपेक्षा अधिक चालणार, मिळणार हे फायदे

मुंबई: जिओमध्ये(Jio) अनेक रिचार्ज प्लान्स उपलब्ध आहेत. हे प्लान्स विविध किंमतीला असतात आणि वेगवेगळ्या फीचर्ससोबत असतात. आज आम्ही तुम्हाला ९९९ रूपयांच्या रिचार्ज प्लान्सबद्दल सांगत आहोत. यात युजर्सला कॉलिंग, डेटा आणि अनेक फायदे मिळतात.


जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत ९९९ रूपये आहे. या प्लानमध्ये युजर्सला संपूर्ण ९८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. ही ३ महिन्यांपेक्षाही अधिक आहे. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज २ जीबी डेटा वापरण्यास मिळेल. या प्लानमध्ये एकूण १९६ जीबी डेटा वापरण्यास मिळेल.


जिओच्या या रिचार्ज प्लान्समध्ये युजरला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटिडी कॉल मिळेल. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस वापरण्यास मिळतात.


यात युजर्सला कॉम्प्लिमेंट्री अॅप्सचा वापर करण्यास मिळेल. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचाही समावेश आहे.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा